बिग बॉस मराठीच्या घरात पहिलेच एलिमिनेशन पार पडले आहे. यात अभिनेता अक्षय वाघमारे हा घरातून बाहेर पडला आहे. त्यामुळे घरातील सदस्यांमध्ये आणि त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळाले आहे. घरातील प्रत्येक सदस्य अक्षय घरातून गेला म्हणून रडत होता. अशातच या शोमध्ये पहिली वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे. बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात आदिश वैद्यची एंट्री झाली आहे. त्याला पाहून त्याचे चाहते खूपच खुश झाले आहेत. तो बिग बॉसमध्ये येईल अशी चर्चा चालू होती. त्यामुळे त्याला आता शोमध्ये पाहून सगळ्यांना आनंद झाला आहे.
आदिश घरात येताच बिग बॉसने त्याच्यावर एक बहुमूल्य जबाबदारी सोपवली आहे. आदिशची घरात एंट्री टेंम्प्टेशन रूममधून होते. तो तिथे उभा असतो तेव्हा घरातील सदस्यांना तो स्क्रीनवर दिसतो. त्यावेळी बिग बॉस त्याला एक पावर कार्ड स्वीकारण्याची सुवर्णसंधी देतात. ज्यामुळे पुढील आठवड्यात घरातील कोणता व्यक्ती कोणते काम करेल हा निर्णय तो घेऊ शकणार आहे. यासोबत बिग बॉस सांगतात की, हे पावर कार्ड जर त्याने स्वीकारले तर त्याला घरातील सदस्यांना यामुळे नुकसान सहन करावे लागणार आहे. जर आदिशने हे पावर कार्ड स्वीकारले तर बिग बॉसच्या पुढच्या आदेशापर्यंत घरातील तीन सदस्यांना रात्री जागून बिग बॉसच्या घराचा पहारा द्यावा लागणार आहे. (Bigg Boss Marathi 3 : first wild card contestant adish vaidya get opportunity to used power card)
तसेच हे तीन सदस्य कोण असणार आहेत, याचा निर्णय देखील बिग बॉसने आदिशवर सोपवला आहे. त्यामुळे आता आदिश हे पावरकार्ड स्वीकारेल का? त्याने पावर कार्ड स्वीकारले तर तो कोणत्या तीन सदस्यांची नावे घेईल? नावे घेतली तर पहिल्याच आठवड्यात तो घरातील इतर सदस्यांचा शत्रू होईल का ? हे बघण्यासाठी आपल्याला रोज रात्री ९: ३० वाजता कलर्स मराठीवर बिग बॉस मराठी पाहावे लागणार आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण
सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे