Tuesday, July 9, 2024

Bigg Boss Marathi: ‘आपल्यासाठी नवीन सुरुवात असेल’, कॅप्टन्सी टास्कमध्ये मदतीसाठी गायत्रीने मागितली विकासला साथ

सर्वात लोकप्रिय शो अशी ओळख मिळवलेला ‘बिग बॉस मराठी’ सुरू झाल्यापासून चांगलाच चर्चेत आहे. सध्या या शोचे तिसरे पर्व चालू आहे, जे इतर पर्वांप्रमाणे हिट होताना दिसत आहे. नुकतेच या घरात चालू असलेल्या ‘हल्लाबोल’ टास्कला काल पूर्णविराम लागला. टीम A आणि टीम B या दोन्ही टीममधून टीम A चा विजय झाला. मोटर बाईकवर जय आणि गायत्री बसले होते. तर कार्याचा संचालक उत्कर्षने भेदभाव केला, असं मत टीम B मधल्या सदस्यांनी मांडलं आणि त्याच्या निर्णयाचा निषेध केला.

शेवटी टीम A या कार्यामध्ये विजयी ठरली आणि यामधूनच कॅप्टन्सी कार्यासाठी दोन उमेदवार निवडण्याचा आदेश बिग बॉस यांनी विजेत्या टीमला दिला. विचारविनिमयानंतर जय आणि गायत्री ही दोन नावे पुढे आली. तर आज या दोघांमध्ये रंगणार आहे “खुलजा सिम सिम” हे कॅप्टन्सी कार्य. कॅप्टन्सी पदासाठी स्पर्धक पुन्हा एकदा एकमेकांविरुध्द भिडताना दिसणार आहेत. तेव्हा या कार्यात आता कोण जिंकणार हे पाहणे मजेदार ठरणार आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात कधी कोणत्या सदस्याला कोणाची गरज कधी लागेल सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेला खूप विचार करून बोलणं, वागणं अतिशय महत्वाचे असते. या घरात सगळंच अनिश्चित आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याचचं उदाहरण म्हणजे आज विकाससोबत गायत्री चर्चा करताना दिसणार आहे. हल्लाबोल या टास्कमध्ये जे घडलं ते आपण पाहिलंच.

यावेळी गायत्री विकासला सांगताना दिसते की, “जर मी कॅप्टन बनले, तर जयपेक्षा जास्त निष्पक्ष राहू शकते. जयपेक्षा जास्त शांतता मी ठेऊ शकते. टास्कच्या वेळेसचा आरडाओरडा आणि मारामारी होणार नाही आणि मी फेअरप्ले करू शकते, असं मला वाटतं. जर तू मला पाठिंबा दिलास, तर मला वाटतं ही आपल्यासाठी नवीन सुरुवात असेल. जे काही घडलं त्याच्यानंतर ही एक चांगली सुरुवात असेल. माझ्या डोक्यात काही नाही तुझ्या डोक्यात काही नाही.” तर विकास तिला म्हणतो की, “जर अशी कुठली वेळ आली आणि मला तुझी गरज लागली तर कॅप्टन म्हणून तू मला साथ देशील का?” गायत्री त्याला म्हणते की, “माझ्याकडे असं कोणीच अजून तरी मागितलेलं नाहीये, तर मी नक्की प्रयत्न करेन तसं करण्याचा.”

आता पुढं नक्की काय होतं, हे पुढच्या भागातच कळेल. म्हणून हा भाग बराच रंजक ठरणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-उफ्फ ब्यूटी! तेजस्विनीच्या स्टायलिश लूकने इंटरनेटवर लावली आग, बेडवर बसून देतेय फोटोसाठी पोझ

-शाहरुख खान पुन्हा एकदा दिसणार ‘डबल रोल’मध्ये? जाणून घ्या काय आहे आगामी चित्रपटाची कथा

-उर्वशी रौतेलालाही मिळाला दुबईचा गोल्डन व्हिसा, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

हे देखील वाचा