संपूर्ण महाराष्ट्रातील एन्टरटेन्मेंट आता अनलॉक झाले आहे. प्रेक्षकांची दोन वर्षांची प्रतीक्षा संपली आहे आणि टेलिव्हिजनवरील सर्वात मोठा शो ‘बिग बॉस मराठी ३’ शोची रविवारी (१९ सप्टेंबर) सुरुवात झाली आहे. या शोचे लाखो दीवाने आहेत. शोमध्ये मनोरंजन क्षेत्रासोबत इतर काही क्षेत्रातील एकूण १५ स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे.
शोमध्ये नुकतेच जय दुधाने याचा प्रवेश झाला आहे. जय हा ‘स्प्लिट्सवीला’ या शोमध्ये स्पर्धक होता. यासोबत जय हा एक व्यावसायिक आहे. त्याने अभिनयक्षेत्रात जरी जास्त नाव कमावले नसले, तरीही त्याच्या व्यावसायिक आयुष्यात तो यशस्वी व्यक्तिमत्त्व आहे. (Bigg Boss Marathi 3 grand premium starting, contestant enter in BBM house)
जय दुधानेसोबत एका ग्लॅमरस अभिनेत्रीची शोमध्ये एन्ट्री झाली आहे. ती म्हणजे अभिनेत्री मीनल शाह. मीनल ‘रोडीज’ या शोमधून नावारूपाला आली आहे. या शोमध्ये तिने ‘ओ साकी साकी’ या गाण्यावर डान्स करत दमदार एन्ट्री केली आहे.
‘बिग बॉस मराठी ३’ मध्ये अनेक मराठी मालिका आणि चित्रपटात काम करून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केलेला अक्षय वाघमारे याने बुलेटवर दणक्यात प्रवेश केला आहे. अक्षयने ‘दोस्तीगिरी’, ‘युथ’, ‘बेधडक’, ‘बसस्टॉप’, ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटात काम केले आहे.
बिग बॉसमध्ये पुढचा स्पर्धक आगरी कोळी गाण्यांचा बादशाह अशी ओळख असणारे संतोष चौधरी उर्फ दादुस यांची एन्ट्री झाली आहे. त्यांनी बिग बॉससाठी एक सुंदर गाणे गाऊन बिग बॉसमध्ये प्रवेश केला आहे. संतोष चौधरी यांनी अनेक कोळीगीते गायली आहेत.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वामधील खास आकर्षण म्हणजे म्हणजे त्यांच्या अंगावरील सोने. या शोमध्ये येताना त्यांनी तब्बल अडीच किलो एवढे सोने घातले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-यंदा ‘बिग बॉस मराठी’चे घर होणार भक्तीमय, कलाकारांसोबत ‘या’ कीर्तनकाराचेही झाले आगमन
-‘बिग बॉस मराठी ३’ मध्ये स्पर्धकांचे झाले दणक्यात स्वागत, आहेत लोकप्रिय कलाकार