Wednesday, July 3, 2024

यंदा ‘बिग बॉस मराठी’चे घर होणार भक्तीमय, कलाकारांसोबत ‘या’ कीर्तनकाराचेही झाले आगमन

‘बिग बॉस मराठी ३’ मध्ये एकापेक्षा एक जबरदस्त स्पर्धकांची एन्ट्री होत आहे. ‘बिग बॉस’ हा टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय शो आहे. हिंदीमधील या शोची लोकप्रियता पाहता हा शो मराठीमध्ये सुरू झाला आहे. या शोचे दोन सिझन पूर्ण झाले आहेत. कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्ष या शोची सुरुवात झाली नव्हती. अखेर ‘बिग बॉस’प्रेमींची प्रतीक्षा संपली आहे. ‘बिग बॉस मराठी ३’ च्या ग्रँड प्रिमिअमला सुरुवात झाली आहे.

शोमध्ये पुढची स्पर्धक तृप्ती देसाई हिची एन्ट्री झाली आहे. तृप्ती ही ग्लॅमर क्षेत्रापासून लांब आहे. ती एक समाजसेविका आहे. तिने समाजातील अनेक अनिष्ट रूढी, परंपरा या विरोधात लढा दिला आहे. अनेक मोर्चे, मिरवणुका काढून तिने समाजप्रबोधन केले आहे. आता ती या शोमध्ये काय कमाल करणार आहेत, हे पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. (Bigg Boss Marathi 3 grand premium starting, contestant enter in BBM house)

जिने अनेक नकारात्मक भूमिका निभावल्या आहेत, अनेक मालिका तसेच चित्रपटात जिने खाष्ट सासूची भूमिका निभावली आहे, ती सुरेखा कुडची हिचा ‘बिग बॉस मराठी ३’ मध्ये दणक्यात प्रवेश केला आहे. सुरेखा ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिका तसेच चित्रपटात काम केले आहे. तिने ‘फॉरेनची पाटलीन’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘मास्तर एके मास्तर’, ‘तांदळा’ यांसारख्या चित्रपटात काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

यानंतर बिग बॉसमधील पहिल्या जोडीचे आगमन झाले आहे. शोमध्ये अभिनेत्री गायत्री दातार आणि विकास पाटील यांची एन्ट्री झाली आहे. त्यांनी एका रोमँटिक गाण्यावर डान्स केला आहे. त्यांचे देखील एकदम दणक्यात स्वागत झाले आहे. गायत्री दातार हिने झी मराठी या वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेत सुबोध भावेसोबत काम केले आहे. तसेच तिने ‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये देखील काम केले आहे, तर विकास हा देखील एक लोकप्रिय अभिनेता आहे. नुकतेच त्याची कलर्स मराठीवरील ‘बायको अशी हवी’ या मालिकेत काम केले आहे. नुकतेच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. तसेच त्याने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

बिग बॉसचे घर यावर्षी अध्यात्मिक होऊन जाणार आहे. जी स्पर्धकांना तसेच सगळ्या प्रेक्षकांना भक्तिमय करून टाकणार आहे.

ह.भ.प. शिवलीला पाटील हिचा प्रवेश झाला आहे. शिवलीला ही एक समाजप्रबोधक आणि कीर्तनकार आहे. तिने अनेक किर्तनं केली आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस मराठी ३’ मध्ये स्पर्धकांचे झाले दणक्यात स्वागत, आहेत लोकप्रिय कलाकार

-‘बिग बॉस मराठी ३’च्या ग्रँड प्रीमियरला सुरुवात, ‘सिद्धू’ करतोय होस्टिंग, तर ‘या’ दोन स्पर्धकांची एन्ट्री

-गुलाबी रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये अन्विता दिसतेय एकदम ‘बार्बी डॉल’, कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव

हे देखील वाचा