Saturday, June 29, 2024

‘बिग बॉस मराठी ३’च्या ग्रँड प्रीमियरला सुरुवात, ‘सिद्धू’ करतोय होस्टिंग, तर ‘या’ दोन स्पर्धकांची एन्ट्री

गेले दोन वर्ष संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षक ज्या शोची आतुरतेने वाट बघत होते. तो म्हणजे ‘बिग बॉस मराठी ३’ होय. या शोच्या ग्रँड प्रीमियरला सुरुवात झाली आहे. शोची सुरुवात एवढी रंगतदार झाली आहे की, पुढे सगळा शो एकदम भारी असणार आहे, यात काही वादच नाही. सर्वांत खास गोष्ट म्हणजे हा शो महेश मांजरेकर यांच्यासोबत आपल्या सर्वांचा लाडका सिद्धार्थ जाधव होस्ट करत आहे.

या शोमध्ये सिद्धार्थ जाधवची एन्ट्री एकदम दिमाखात झाली आहे. गणरायाची आराधना करत त्याने सुरुवातीलाच सर्वांचे मनोरंजन केले आहे. त्याचा झक्कास डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळाला आहे. यानंतर महेश मांजरेकर यांची देखील एकदम मस्त अंदाजात एन्ट्री झाली आहे. त्यांनी बिग बॉसचे नवीन गाणे ‘ओ भाऊ चावडीवर या’ या गाण्यावर डान्स केला आहे. (Bigg Boss Marathi 3 grand premium starting, two contestant enter in BBM house)

सिद्धार्थ आणि महेश यांच्या एन्ट्रीनंतर त्यांच्यातील विनोदी अंदाज पाहायला मिळाला आहे. त्यानंतर त्या दोघांनी घरात एन्ट्री केली आणि संपूर्ण घर दाखवले आहे. दरवर्षी प्रमाणेच यावर्षी देखील बिग बॉसचे भव्यदिव्य घर उभारले आहे. यामध्ये स्पर्धकांना नक्कीच मजा येणार आहे.

या शोमध्ये नुकतेच पहिल्या स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे. खरं तर बिग बॉसच्या घरात जाणारा पहिला स्पर्धक कोण अणारस आहे, याची सगळ्यांना उत्सुकता लागली होती. अखेर या शोमधील पहिली स्पर्धक सर्वांसमोर आली आहे. ती स्पर्धक म्हणजे अभिनेत्री सोनाली पाटील.‌ सोनाली ही मागील अनेक दिवसांपासून खूप चर्चेत आहे. तिने झी मराठी या वाहिनीवरील ‘देवमाणूस’ या मालिकेत वकिलाचे पात्र निभावले होते. या मालिकेनंतर ती खूप लोकप्रिय झाली आहे. अशात तिला या शोमध्ये पाहून तिच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. तसेच आता या शोमध्ये तिचे कोणते जलवे पाहायला मिळणार आहे, हे बघण्यासाठी सगळे उत्सुक आहेत.

तसेच या शोमध्ये दुसऱ्या स्पर्धकांची देखील एन्ट्री झाली आहे. या शोमध्ये दुसरा स्पर्धक अभिनेता विशाल निकम हा आहे. या आधी त्याने ‘धूमस’ आणि ‘मिथुन’ या चित्रपटात काम केले आहे.

तसेच त्याने स्टार प्रवाहवरील ‘दख्खनचा राजा जोतिबा’ या मालिकेत काम केले आहे. शोमध्ये त्याने ‘माय भवानी’ या गाण्यावर डान्स करून प्रवेश केला आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-गुलाबी रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये अन्विता दिसतेय एकदम ‘बार्बी डॉल’, कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव

-अभिज्ञा भावेचे स्टायलिश कॉर्पोरेट लूकमधील फोटो व्हायरल, पाहून तुम्हीही म्हणाल, ‘भारीच की!’

-गुलाबी साडी नेसून आर्चीने घेतली ‘मिरर सेल्फी’; चाहत्यांना भावतोय अभिनेत्रीचा सोज्वळ अंदाज

हे देखील वाचा