Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘बिग बॉस मराठी’च्या घरात जय अन् आदिशने केला रोमँटिक डान्स; तुम्ही पाहिला का व्हिडिओ?

या आठवड्यात ‘बिग बॉस मराठी’च्या घरात फुल मनोरंजनाचा तडका लागला होता. ‘बीबी कॉलेज’ सुरू असल्याने सगळेच सदस्य खूप एन्जॉय करत होते. कॅप्टन्सी टास्क करताना पुन्हा एकदा घरातील सदस्यांमध्ये राडे पाहायला मिळाले आहेत. वीकेंडला मांजरेकर या सगळ्या सदस्यांची खरडपट्टी काढताना दिसत आहेत. ज्यांनी आठवडाभर चांगले काम केले त्यांचे मांजरेकरांनी भरभरून कौतुक केले. मात्र, ज्यांनी अप्रामाणिक राहून काम केले, त्यांना मांजरेकरांनी चांगलेच सुनावले आहे.

या सगळ्या गोष्टींसोबत वीकेंडला चुगली, प्रेक्षकांच्या अतरंगी डिमांड, तसेच वेगवेगळे मजेशीर टास्क पाहायला मिळतात. बिग बॉस मराठीच्या घरातील वातावरण हसते खेळते राहण्यासाठी टास्क घेतले जातात. अशातच या आठवड्यात प्रेक्षकांकडून जय आणि आदिशसाठी एक अतरंगी डिमांड आली आहे. जे ते दोघेही पूर्ण करताना दिसत आहेत. (Bigg Boss Marathi 3 : jay dudhane and adish vaidya dance on romantic song)

या आठवड्यात जय आणि आदिशला एका चाहतीने त्या दोघांनी रोमँटिक डान्स करावा अशी डिमांड ठेवली आहे. यावर जय आणि आदिश देखील अत्यंत मजेशीर अंदाजात डान्स करताना दिसत आहे. ते दोघेही ‘तोळा तोळा’ या गाण्यावर अत्यंत मजेशीर अंदाजात रोमँटिक डान्स करतात. त्यांचा डान्स पाहून घरातील सगळे सदस्य खूप हसतात. तसेच आदिश आणि जय देखील खूप एन्जॉय करतात आणि हसतात.

या आठवड्यात घरातील सदस्यांना भेटायला बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील शिव ठाकरे आणि नेहा शितोळे हे खास पाहुणे येणार आहेत. यावेळी ते घरातील सदस्यांना मार्गदर्शन करताना दिसणार आहेत. यावेळी त्यांना बघून घरातील सगळेच सदस्य खुश होतात. तसेच या आठवड्यात एलिमिनेशन आहे, त्यामुळे या आठवड्यात कोणत्या स्पर्धकाचा प्रवास इथेच थांबणार आहे, हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तू तुझा प्रोग्राम सुरू कर, मीच बॉस म्हणून’, वीकेंडला मांजरेकरांकडून मीरा अन् गायत्रीची खरडपट्टी

-‘कुछ कुछ होता है अभ्या…’, म्हणत ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षयाने मजेशीर फोटो केले शेअर

-‘तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची’, कुशल बद्रिकेच्या फोटोवर चाहत्यांची भन्नाट कमेंट ठरतेय लक्षवेधी

हे देखील वाचा