Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

उत्कर्षने जवळच्या मित्राला केले थेट नॉमिनेट, चिडलेला जय म्हणाला, ‘मी आता कोणासाठी काहीही…’

‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वातील सातवा आठवडा चालू झाला आहे. जसजसा खेळ पुढे चालला आहे. तसतशी या खेळाची काठिण्य पातळी वाढत चालली आहे. या शोमधून नुकतीच आविष्कार दार्व्हेकरची एक्झिट झाली आहे. तसेच निथा शेट्टी हिची शोमध्ये दुसरी वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. त्यामुळे घरातील सदस्यांना एकीकडे आविष्कार गेल्याचे दुःख होते, तर दुसरीकडे निथाच्या येण्याचा आनंद होता. आता कुठे आविष्कार खेळात त्याचे योगदान दाखवत होता, परंतु त्याला त्याच्या चाहत्यांचा पाठिंबा कमी पडला.

अशातच घरात नॉमिनेशन कार्य झाले आहे. हे कार्य बिग बॉसने दिवाळीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन तयार केले होते. दिवाळीनिमित्त घराला साजेसे असे तोरण लावायचे होते. या तोरणात जे सदस्य घरात राहण्यास पात्र आहेत, त्यांचे फोटो लावायचे होते, तर जे घरात राहण्यास अपात्र आहेत, त्यांचे फोटो काढायचे होते. या कार्यात बिग बॉसने एक-एक स्पर्धकाला रूममध्ये बोलावून हे कार्य करण्यास सांगितले. त्यांनी तोरणावर असलेल्या कोणत्याही दोन स्पर्धकांना नॉमिनेट करायला सांगितले, तर त्यांच्या जागी नॉमिनेट झालेल्या दोन सदस्यांना सेफ करायला सांगितले होते. यावेळी सगळेच हे कार्य करतात. (Bigg Boss Marathi 3: jay dudhane get angry on Utkarsh shinde for nominate him)

यावेळी उत्कर्ष हा तृप्ती देसाई आणि गायत्री यांना सेफ करून जय आणि मीनल यांना नॉमिनेट करतो. आपल्या जवळच्या मित्राने आपल्याला नॉमिनेट केल्यामुळे जयला खूप राग आला. त्याने नक्की असे का केले असेल, असे अनेक प्रश्न त्याच्या मनात येऊ लागले. त्यानंतर जयने उत्कर्षशी अबोला धरला. नंतर उत्कर्षने त्याला का नॉमिनेट केले याचे कारण सांगतो आणि त्यांच्यातील मैत्री पुन्हा ठीक होते.

खरं तर, जय नॉमिनेट झाल्यामुळे नाहीतर उत्कर्षने त्याला नॉमिनेट केल्यामुळे नाराज झाला. जय नेहमीच सगळ्यांची साथ देत असतो, परंतु त्याला कोणीही साथ देत नाही, असे त्याचे म्हणजे होते. यावर तो स्नेहा आणि दादूस यांना म्हणतो की, “मी आता कोणासाठी काहीही करणार नाही, मी आता एकटा खेळणार आहे.”

या आठवड्यात, तृप्ती, जय, मीनल, सोनाली हे स्पर्धक नॉमिनेट आहेत, तर मागील आठवड्यात उत्कर्षने पावर कार्ड स्वीकारल्यामुळे विशाल थेट नॉमिनेट झाला होता. त्यामुळे या आठवड्यात हे पाच स्पर्धक नॉमिनेट आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जांभळ्या रंगाची साडी, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर; तेजश्री प्रधानचा दिवाळी लूक पाहून चाहतेही फिदा

-‘रमाची खूप आठवण येतीये,’ म्हणत जितेंद्र जोशीने सांगितल्या त्याच्या आजीसोबतच्या गोड आठवणी

-वृत्तपत्राची एडिटर ते एक नावाजलेली अभिनेत्री, ‘असा’ आहे सोनाली कुलकर्णीचा अभिनयप्रवास

हे देखील वाचा