Monday, July 8, 2024

‘माझं हृदय स्वीकाराल का?’, बिग बॉसच्या घरात चक्क सुरेखा कुडचींना ‘या’ व्यक्तीने केले प्रपोज

बिग बॉसच्या घरातील वातावरण कधी बदलेल काही सांगता येत नाही. आता भांडलेले सदस्य थोड्या वेळानंतर लगेच एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरताना दिसतात. खरं तर ही या घराची खासियत आहे की, या घरात जास्त काळ कोणी नाराज राहू शकत नाही. कारण प्रत्येकाला २४ तास येथे एकमेकांचा सामना करावा लागतो. नुकताच बिग बॉस घरात वीकेंडचा डाव रंगला होता. ज्यात कोणाचेच इलिमिनेशन झाले नाही. यानंतर पुन्हा एकदा सदस्यांची नव्याने घरात मजा- मस्ती करायला सुरुवात झाली आहे. अशातच घरात सुरेखा कुडची आणि जय दुधाने यांची ड्रामेबाजी पाहायला मिळत आहे.

बिग बॉसच्या घरात सकाळी सुरेखा ताई डायनिंग टेबलवर बसून भाजी निवडत असतात. तिथे इतर सदस्य देखील बसलेले असतात. तितक्यात तिथे जय येतो आणि म्हणतो की, “मी आज घरात कोणाला तरी गुलाब देणार आहे.” यावर स्नेहा म्हणते की, “कोणाला देणार आहेस?” जय म्हणतो की, “वन अँड ओन्ली, जिने आज निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे.” नंतर जय गुडघ्यावर बसतो आणि म्हणतो की, “काय तुम्ही माझं हार्ट एक्सेप्ट कराल का?”

यावर सुरेखाताई म्हणतात की, “मराठीत सांग.” मग जय म्हणतो की, “तुम्ही माझे हृदय स्वीकाराल का?” यानंतर तो सुरेखा ताईंना गुलाब देतो. यावर त्या म्हणतात की, “पाया नको पडूस बाळा.” या वाक्यानंतर घरातील सगळेच जोरजोरात हसायला लागतात. (Bigg Boss Marathi 3, jay dudhane prapose to surekha kudachi in funny mood)

मग जय म्हणतो की, “अरे हे काय होत आहे.” यावर स्नेहा म्हणते की, “पचका.” यावर सगळेच खूप हसतात. मग सुरेखाताई म्हणतात की, “हे मी माझ्या चष्म्यात लावून ठेवते म्हणजे तुझे हृदय नेहमी माझ्या डोळ्यासमोर राहील.”

अशा प्रकारे बिग बॉस मराठीच्या घरात धमाल पाहायला मिळाली आहे. नेहमीच भांडण-तंटा यासोबतच घरात होणारी मस्ती पाहायला प्रेक्षकांना खूप आवडते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-किंग खानच्या लाडक्या मुलाला ऋतिक रोशनच्या एक्स पत्नीचा पाठिंबा; म्हणाली, ‘तो चांगला मुलगा आहे…’

-एनसीबी शाहरुख खानला लक्ष्य करतेय? लावलेल्या आरोपांवर झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी तोडले मौन

-‘तिचं नाव सुद्धा आठवत नाहीये…’, रणवीर सिंगच्या गर्लफ्रेंडबद्दलच्या ‘या’ प्रश्नावर सलमान खानचं तडकीफड उत्तर

हे देखील वाचा