बिग बॉस हा टेलिव्हिजनवरील सर्वात विवादित असणारा शो आहे. हिंदीसोबत आता मराठीमध्ये देखील हा शो चालू झाला असून, मराठीमध्ये सध्या या शोचे तिसरे पर्व सुरु आहे. या घरात कधी काय होईल सांगता येत नाही. आज गळ्यात गळे घालून फिरणारे सदस्य उद्या एकमेकांच्या भांडायला देखील कमी करणार नाही. कोणाची खेळी कधी बदलेल, हे काही सांगता येत नाही. त्यामुळे घरात एकदमच कोणाशी शत्रुत्व घेऊन चालत नाही. कारण २४ तास सदस्यांना त्यांचाच सामना करावा लागतो. कधीही कोणत्याही टास्कमध्ये कोणाचीही गरज लागू शकते. असेच काहीसे बिग बॉस मराठीच्या घरात पाहायला मिळाले आहे.
नुकतेच घरात ‘हल्लाबोल’ हे साप्ताहिक कार्य पार पडले आहे. या टास्कमध्ये दोन्ही टीममधील स्पर्धक एकमेकांना मोटारसायकलवरून उठवण्यासाठी प्रयत्न करत असतात. यावेळी गायत्रीने समोरच्या टीमला उठवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. तसेच गायत्री आणि जयने देखील त्यांच्या टास्कमध्ये खूप चांगली कामगिरी केली. हा टास्क संपल्यानंतर टीम ए विजयी झाली. त्यामुळे आत बिग बॉसने कॅप्टन्सीच्या टास्कसाठी विजेत्या टीममधील दोन सर्वोत्तम स्पर्धकांची बहूमताने निवड करण्यास सांगितले. त्यावेळी सगळ्यांनी मिळून गायत्री आणि जय यांचे नाव सुचवले.
बिग बॉस आता कॅप्टन्सी टास्कसाठी ‘खुल जा सिम सिम’ हे कार्य सोपवणार आहे. यावेळी गायत्री आणि जयला ते कशाप्रकारे घराचा योग्य कॅप्टन होऊ शकतात हे पटवून द्यायचे आहे. यावेळी त्या दोन स्पर्धकांना समोरच्या टीमकडून मत मिळवायचे आहे. यावेळी जय हा सुरेखा कुडची यांच्याकडे जातो आणि तो किती चांगला आहे आणि घर किती चांगल्या पद्धतीने हाताळू शकतो हे सांगतो. (bigg boss marathi 3 : jay dudhane trying to convience surekha kudchi for vote him in captain task)
त्यावर सुरेखाताई म्हणाल्या, “अच्छा ताई? मध्ये काय काय झालं आहे माहिती आहे ना ? मला विचार करू दे.’ गायत्री त्यावर म्हणाली, “बघा ना ताई मी किती गोड आहे. जयने पण संधी साधली बघा मी कचरा नाही टाकला.” त्यावर सुरेखाताई म्हणाल्या, “तू जे टाकलं आहेस ना ते मला पुढचे चार दिवस आठवत राहणार आहे. मी विचार करते थोडा. ते तुमच्यात काय करतात ना डील काय असेल डील? तू जर जिंकलास तर तुझे अर्धे पैसे मला देशील का?” यावर जय म्हणतो की, “पूर्ण पैसे तुम्हीच घ्या.”
परंतु आता सुरेखा ताई कोणाला त्यांचं मत देणार आहे? हे बघण्यासाठी तुम्हाला १ ऑक्टोबरचा भाग रात्री ९: ३० वाजता पाहावा लागणार आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-उफ्फ ब्यूटी! तेजस्विनीच्या स्टायलिश लूकने इंटरनेटवर लावली आग, बेडवर बसून देतेय फोटोसाठी पोझ
-शाहरुख खान पुन्हा एकदा दिसणार ‘डबल रोल’मध्ये? जाणून घ्या काय आहे आगामी चित्रपटाची कथा
-उर्वशी रौतेलालाही मिळाला दुबईचा गोल्डन व्हिसा, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद