Saturday, July 6, 2024

‘सुरेखा कुडची तू इकुडची का तिकुडची’, वीकेंडला मांजरेकर घेणार सदस्यांची शाळा

‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात या आठवड्यात आपण अनेक वादविवाद झालेले पाहिले आहेत. या आठवड्यात घरात दोन टीम पडल्या. ‘जोडी की बेडी’ ही या आठवड्याची थीम होती. त्यावेळी बिग बॉसने दोन- दोन स्पर्धकांची जोडी बनवली होती आणि त्यांना आठवडाभर एकत्र राहावे लागेल असे सांगितले होते. त्यामुळे आता घरातील हेवेदावे निघून जाईल अशी प्रेक्षकांना आशा होती. परंतु ‘हल्लाबोल’ टास्कमध्ये पुन्हा घरात दोन टीम पडल्या. वाद संपतील असे वाटते होते, ते वाद आणखीनच वाढले. मोटार सायकलवरून समोरच्या टीममधील स्पर्धकांना उठवण्यासाठी प्रत्येकानेच खूप प्रयत्न केले. अगदी घरात मारामारी आणि शिवीगाळ देखील झाली. एवढं करूनही या आठवड्यातील घराचा कॅप्टन मात्र ठरू शकला नाही, पण आता वीकेंडला महेश मांजरेकर सगळ्यांची चांगलीच शाळा घेताना दिसणार आहेत.

कलर्स मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून बिग बॉस मराठीच्या वीकेंडचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये मांजरेकर या आठवड्यातील घरातील कॅप्टन उत्कर्ष शिंदे यांची खरडपट्टी करताना दिसत आहेत. तसेच सुरेखा कुडची या देखील खेळात प्रामाणिक नव्हत्या असे त्यांना सांगतात. (Bigg Boss Marathi 3 : mahesh Manjrekar scold on surekha kudachi and utkarsh shinde for their unfair game)

या प्रोमोमध्ये आपण पाहू शकतो की, मांजरेकर सुरेखा कुडची यांना म्हणतात की, “सुरेखा कुडची तू इकुडची का तिकुडची.” यानंतर ते उत्कर्षला म्हणतात की, “उत्कर्ष समुद्रात पोहायला गेल्यावर तुला त्रास झाला का कधी?” यावर उत्कर्ष म्हणतो की, “सर ते मिठाचं पाणी होतं.” यावर मांजरेकर म्हणतात की, “मिठाचं पाणी काही प्रोब्लेम नव्हता. मिर्चीची धुरी चालते ना तिथे. तू ते सगळं थांबवलं का? तू खूप पार्शल संचालक होता.” यावर सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते.

येणाऱ्या एपिसोडमध्ये मांजरेकर कोणाची शाळा घेणार आहेत. तसेच कोणाचे कौतुक करणार आहेत. हे बघण्यासाठी आता तुम्हाला शनिवारी (२ऑक्टोंबर) रात्री ९:३० वाजता कलर्स मराठीवर ‘बिग बॉस मराठी’ वीकेंडचा डाव पाहावा लागणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मल्हार अडकेल का अंतराच्या प्रेमात? योगिताचा नवीन लूक पाहून, चाहत्यांमध्ये रंगलीय एकच चर्चा

-‘मुलं जन्माला घालायला वेळ कधी मिळतो?’, मलायकाने विचारलेल्या प्रश्नावर कपिलचे मजेशीर प्रत्युत्तर, म्हणाला…

-सुखी आयुष्याला ४ वर्षांनी पुर्णविराम! समंथा अन् नागा चैतन्यने घेतला घटस्फोट; जोडप्याच्या निर्णयाने चाहते दु:खी

हे देखील वाचा