‘बिग बॉस मराठी’च्या घरात गेल्या आठवडाभर सदस्यांनी खूप मस्ती आणि एन्जॉय केले आहे. घरात ‘बीबी कॉलेज’ हा टास्क चालू होता. त्यामुळे घरात शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी खूप मस्ती केली आहे. नाचून, गाऊन धमाल करून हा आठवडा गेला. परंतु जसा कॅप्टन्सी टास्क आला. तसे नेहमी प्रमाणेच घरातील सदस्यांमध्ये भांडणं सुरू झाली. या कार्यात स्नेहा, सुरेखा आणि विशाल हे तीन सदस्य होते. परंतु एकमेकांशी स्पर्धा करताना पुन्हा एकदा घरात मोठ्या प्रमाणात राडे झाले. त्यामुळे या आठवड्यात देखील कॅप्टन्सी टास्क रद्द करण्यात आला.
यानंतर आता कॅप्टन नाही म्हणून घरात कोण काम करणार याबाबत चर्चा चालू होती, तेव्हा मीरा आणि गायत्रीने घरात त्या कोणतेही काम करणार नाही असे सांगितले. तसेच घरातील इतर सदस्यांनी केलेले जेवण खाणार नाही आणि त्या त्यांचे वेगळे जेवण करतील असे सांगितले. त्यामुळे मीरा तिचे नियम ती स्वतः बनवते असे सगळेजण म्हणतात. (Bigg Boss Marathi 3 : Manjrekar scold meera on weeked )
त्यामुळे या वीकेंडला मांजरेकर मीरा आणि गायत्रीला चांगलेच खडेबोल सुनावणार आहेत. मांजरेकर मीरा आणि गायत्रीला म्हणतात की, “मीरा आणि गायत्रीने ठरवले की, आम्ही काही करणार नाही. परत तिकडे जाऊन लुडबूड करणार की, आम्हाला एक गॅस द्या, आम्हाला एक माचिस द्या. आख्खा वेळ तर माचिस टाकत असता.” यानंतर मीरा बोलायला जाते तेव्हा मांजरेकर म्हणतात की, “मीरा पुढच्या वर्षी तू तुझा प्रोग्राम सुरू कर, मीच बॉस म्हणून.” तसेच ते म्हणतात की, “गेले तीन आठवडे घरात कॅप्टन नाही असे नाही, गेले तीन आठवडे मीराच घरात कॅप्टन आहे.”
बाकी सदस्यांना देखील मांजरेकर खूप ओरडतात. तसेच या आठवड्यात ज्या स्पर्धकांनी चांगली कामगिरी केली, त्यांचे मांजरेकरांनी भरभरून कौतुक देखील केले आहे
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘कुछ कुछ होता है अभ्या…’, म्हणत ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षयाने मजेशीर फोटो केले शेअर
-‘टू क्युटीज इन वन फ्रेम’, झी मराठी पुरस्कार सोहळ्यातील नेहा आणि परीचा मोहक फोटो व्हायरल