Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘हे मीरा जग्गनाथचं घर नाहीये’, वीकेंडला मांजरेकरांनी चावडीवर वाचला मीराचा आठवडाभराचा पाढा

‘बिग बॉस मराठी’च्या घरात या आठवड्यात चांगलेच राडे झाले आहेत. घरच्या सदस्यांमध्ये चांगलीच मारामारी आणि शिवीगाळ झालेला दिसत आहे. त्यामुळे या वीकेंडला मांजरेकर घरातील सदस्यांची चांगलीच शाळा घेणार आहे. नुकतेच शनिवारी (२ ऑक्टोबर) भागातील काही प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये मांजरेकर मीरा जग्गनाथला चांगलेच खडेबोल सुनावताना दिसत आहेत.

कलर्स मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून ‘बिग बॉस मराठी’चा एक प्रोमो व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मांजरेकर मीराला तिच्या संपूर्ण आठवड्यातील वागणूकीबाबत खूप ओरडत असतात. मांजरेकर मीराला म्हणतात की, “या घरात बिग बॉसपेक्षा जास्त पावर कोणाकडे असेल तर ती मीराकडे. काहीही झालं, बिग बॉसने काही सांगितलं तर, मीराचं नेहमी हेचं असतं की, मला हे पटत नाही.” यानंतर मांजरेकर तिला म्हणतात की, “तुला पटो अथवा न पटो आम्हाला काहीही फरक पडत नाही. हे बिग बॉसचं सिझन आहे. मीरा जग्गनाथचं हाऊस नाहीये.” (Bigg Boss Marathi 3, Manjrekar scold on meera jagnnath in weekend)

यावर मीरा शांत बसून केवळ ऐकत होती. यानंतर मांजरेकर म्हणतात की, “काही झालं की, फक्त आपलं वूमन गार्ड, गायत्रीबाबत तुम्ही किती ओरडलात गं वूमन गार्ड? अगदी तृप्ती देसाईपासून सगळे ओरडत होते, पण जेव्हा सोनाली आणि सुरेखा तिथे बसल्या होत्या, तेव्हा त्या नव्हत्या का वूमन, तेव्हा नाही का तुम्हाला हे आठवलं.”

यावर मीरा देखील खूप घाबरलेली दिसत आहे. त्यामुळे आता येत्या एपिसोडमध्ये पुढे नक्की काय होणार आहे, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच मांजरेकर कोणाकोणाची शाळा घेणार आहे. हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुरेखा कुडची तू इकुडची का तिकुडची’, वीकेंडला मांजरेकर घेणार सदस्यांची शाळा

-मल्हार अडकेल का अंतराच्या प्रेमात? योगिताचा नवीन लूक पाहून, चाहत्यांमध्ये रंगलीय एकच चर्चा

-‘मुलं जन्माला घालायला वेळ कधी मिळतो?’, मलायकाने विचारलेल्या प्रश्नावर कपिलचे मजेशीर प्रत्युत्तर, म्हणाला…

हे देखील वाचा