Tuesday, July 9, 2024

बिग बॉस मराठी ३: ‘काही मानसिक प्रॉब्लेम झालाय का?’, म्हणत मांजरेकरांनी घेतली विशालची शाळा

‘बिग बॉस मराठी’च्या घरात विकेंडचा डाव रंगला आहे. आठवड्याभरात जे काही झाले त्याचा आराखडा मांजरेकरांनी घरातील सदस्यांसमोर मांडला. ज्या सदस्यांनी चांगले काम केले, त्यांचे मांजरेकरांनी कौतुक केले. तर ज्यांनी चुकीचे काम केले, त्यांना मात्र खडेबोल सुनावले. त्यांनी प्रत्येकालाच त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली. या सगळ्यात त्यांनी विशाल निकमला त्याने आठवडाभर जे काही चुकीचे काम केले त्याबद्दल त्याला सांगितले.

घरात राक्षस आणि देवदूत हा टास्क चालू होता. यावेळी राक्षसाच्या भूमिकेत असताना विशालने सगळ्यांना खूप अवघड टास्क दिले होते. तसेच तो खूपच रागात सगळ्यांशी बोलत होता. या दरम्यान विशाल आणि विकासमध्ये जोरदार भांडण देखील झाले. टास्कदरम्यान त्यांच्यात काही गैरसमज झाल्याने त्यांच्यात वाद झाले. यावेळी मांजरेकर त्याला म्हणाले की, “विशाल त्या दिवशी काय प्रॉब्लेम झाला होता का? काही मानसिक प्रॉब्लेम होता का? तुझ्या चेहऱ्यावर एक वेडेपणाची झाप होती. तू विकासकडून जे काही करून घेतलं ते बाहेर खूप भीषण दिसत होतं.” (Bigg Boss Marathi 3 : Manjrekar scold on Vishal nikam for his game plan on weekend)

यासोबत त्यांनी विशालला देखील ज्या काही त्याने प्रतिक्रिया दिल्या त्यावर त्याला सुनावले. तसेच त्याने खेळाडू वृत्तीने हा टास्क केला नाही असे सांगितले. यासोबत त्यांनी मीनल, जय, मीरा, स्नेहा यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली. तसेच तृप्ती देखील टास्क दरम्यान चुकल्या हे सांगितले.

यासोबत त्यांनी या आठवड्यात सुरक्षित असणाऱ्या तीन सदस्यांची नावे सांगितली. या आठवड्यात विकास, विशाल आणि जय हे सदस्य बहूमताने सुरक्षित आहेत. आता घरात स्नेहा, आविष्कार, सोनाली आणि गायत्री हे नॉमिनेटेड सदस्य राहिले आहेत. त्यावेळी आता त्या तिघांमध्ये कोण घराबाहेर जाईल हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. तसेच आज घरात दुसरी वाईल्ड कार्ड एन्ट्री देखील होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मिथिला पालकरचा स्टायलिश लूक घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ, हटके पोझने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

-किती गोड! सोज्वळ मयुरीचा ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांना भुरळ, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

-दुःखद बातमी! प्रसिद्ध संगीतकार प्रभाकर जोग यांचे निधन, ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हे देखील वाचा