Saturday, July 6, 2024

साप्ताहिक कार्यात मीराने मीनलला दिले ‘हे’ मोठे आव्हान, ऐकून सर्वच झाले स्तब्ध

बिग बॉस मराठीच्या घरात अनेक नवनवीन टास्क पाहायला मिळत आहे. अशातच या खेळात चौथ्या आठवड्यात घरात ‘स्वर्ग की नरक’, हे साप्ताहिक कार्य रंगले आहे. तसेच ‘अद्भुत नगरी’ ही या आठवड्यातच थीम आहे. त्यामुळे घरात काही नरकातील लोकं‌ आणि काही स्वर्गातील लोकं राहत आहेत.

आता या साप्ताहिक कार्यात नरकातील लोकांनी काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे तर स्वर्गातील लोकांनी पांढऱ्या रंगाचे कपडे घातले आहे. या टास्कमध्ये नरकातील लोकांनी स्वर्गातील लोकांना त्यांना पाहिजे तसे काम करायला सांगायचे आहे. तसेच स्वर्गातील देवदूतांना यात संयम दाखवून राक्षसांनी सांगितलेलं प्रत्येक काम हसत मुखाने करायचे आहे. या गोष्टी करताना देवदूतांना तिथे एक मनोरा रचायचा असतो आणि राक्षसांना तो मनोरा पाडायचा असतो. (Bigg Boss Marathi 3 : meera give hardest task to minal)

यावेळी राक्षस देवदूतांशी खूप क्रूर पद्धतीने वागताना दिसले. यात राक्षस त्यांना स्विमिंग पूलमध्ये जाण्यास सांगतात, घरात झोपून कचरा काढायला सांगतात, एका पायावर उभे राहायला सांगतात. तसेच बाकी अनेक त्यांना न जमणाऱ्या गोष्टी सांगतात. यात मीरा मीनलला टक्कल कर असे सांगते. यावेळी ती मीनलच्या हातात सेव्हींग मशीन देते आणि तिला टक्कल करायला सांगते.

यावेळी मीनल देखील तसे करण्यास तयार होते आणि हातात मशीन घेऊन टक्कल करायला सुरुवात करते. त्यावेळी मीरा तिला थांबवते आणि म्हणते की, “विचार कर हा नॉमिनेशन टास्क नाहीये. याचा तुलाच त्रास होईल तू माघार घेऊ शकते.” परंतु तरीही ती करण्यास तयार होते.‌ पण मीनल केवळ ‘तुम्ही म्हणाल तसे’, असे म्हणत सगळा वेळ घालवते आणि काहीच करत नाही.

आता या टास्कमध्ये कॅप्टनसाठी कोणते दोन उमेदवार निवडले जाणार आहेत. तसेच या आठवड्यात कोण कॅप्टन होईल याकडे सगळ्या बिग बॉस प्रेमींचे लक्ष लागून आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-यंदा कर्तव्य आहे! रणबीर आणि आलिया अडकणार लग्नबंधनात; इटलीत घेणार सात फेरे?

-अभिनेत्री नेहा शर्माच्या फोटोसोबत करण्यात आली होती अश्लील छेडछाड, तिनेही फोटो शेअर करत घेतला समाचार

-अंदमानातील सेल्युलर जेलला भेट देताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल गौरवोद्गार काढत कंगना म्हणाली…

हे देखील वाचा