बिग बॉस मराठीच्या घरात नॉमिनेशनसाठी नवा टास्क रंगणार आहे ‘माझे मडके भरी’. या टास्कसाठी देखील सर्व सदस्य दोन ग्रुप्समध्ये विभागले जाणार आहेत. याच मुद्द्यावरून घरातील सदस्यांमध्ये याच संदर्भात चर्चा रंगणार आहे. मीनल, विकास, सोनाली आणि आविष्कार हे चौघं याच टास्कवरून आणि कॅप्टनशिप पदावरून बोलताना दिसले. ज्यामध्ये कॅप्टन्सी टास्कसाठी उमेदवारी मिळणे अत्यंत महत्वाचे आहे आणि त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे त्यांच्या बोलण्यावरून समजत आहे. या चर्चे दरम्यान ते टास्कच्या दृष्टीने एक प्लॅन बनवताना देखील दिसले.

या संभाषणात मीनल सांगताना दिसणार आहे, “आता जो टास्क आहे त्यामध्ये देखील दोन ग्रुप्स असणार आहेत. यानंतर कॅप्टन्सी टास्क होणार ज्यामध्ये दोन उमेदवार निवडले जाणार. जर आपल्यातला कोणी त्यांच्या टीममध्ये गेला तर उत्कर्षसोबत डील करायची कारण तसंही त्याला डील करायला खूप आवडत. त्याला सांगायच की मी शंभर टक्के तुमच्या बाजूने खेळणार फक्त पुढच्या कॅप्टन्सी टास्कसाठी तुम्ही माझं नावं द्या. म्हणजे एक त्यांच्या ग्रुपमधला आणि एक आपल्या ग्रुपमधला अशी बरोबर स्पर्धा होईल.” यावर विकास म्हणतो, “उत्कर्षला जर डील दिली तर एक तर तो नाही म्हणेल. पण, जर तो हो म्हणाला तर त्याला शब्द पाळावाच लागेल कारण त्याला आधीच डबल ढोलकी म्हणून नावं आहे.”

सध्या चालू आठवड्यामध्ये बिग बॉसच्या घरात कोणीच कॅप्टन नाहीये. मागच्या आठवड्यात जय आणि गायत्रीमधे झालेल्या कॅप्टनशिपचा टास्क दोघानांही पूर्ण करता आला नसल्यामुळे बिग बॉसने हा टास्क रद्द करत या आठवड्यात घरात कोणीच कॅप्टन नसल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे आता या नवीन कॅप्टनशिप टास्कमध्ये घरात कोण कॅप्टन होणार हे पाहणे असूक्त्याचे ठरणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सर्वांना पोट धरून हसवणाऱ्या कपिलने एकेकाळी केलंय टेलिफोन बुथवर काम, वाचा त्याच्या संघर्षाची कहाणी
-यामी गौतमचा मोठा खुलासा, किशोरवयीन काळापासून ‘या’ आजाराने आहे अभिनेत्री ग्रस्त