Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘बिग बॉस मराठी’च्या घरात होणार नॉमिनेशन टास्क, आदिश अन् स्नेहामध्ये शाब्दिक वाद

‘बिग बॉस मराठी’च्या घरात नुकतेच एका नवीन सदस्याची भर पडली आहे. परंतु त्याच्या येण्याचे घरातील बहुतांश सदस्य नाराज आहेत. कारण घरात येतावेळी त्याने पावर कार्ड स्वीकारून घरातील तीन सदस्यांना रात्री जागून घराला पहारा द्यायला सांगितलं होतं. सोबतच पहिल्याच रात्री त्यांच्यामध्ये आणि जयमध्ये चांगलेच राडे झालेले दिसून आले आहेत. तसेच स्नेहा आणि त्याच्यामध्ये देखील काही वाद झाले आहेत. अशातच घरात या आठवड्याचा नॉमिनेशन टास्क रंगणार आहे. ‘बिबी कॉलेज’ ही या आठवड्याची थीम असणार आहे. त्यामुळे घरातील स्पर्धकांसोबत प्रेक्षकांना देखील चांगलीच मजा येणार आहे.

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये असे दिसत आहे, सदस्यांची जीपमध्ये बसण्यासाठी धावपळ सुरू आहे. या जीपमध्ये गायत्री, उत्कर्ष, स्नेहा, जय आणि मीरा बसलेले आहेत. जीपमधील सदस्यांनी बहुमताने निवडलेल्या एका सदस्याला जीपमधून उतरावे लागणार आहे. यावर मीरा, उत्कर्ष आणि गायत्री हे ठरवतात की, स्नेहाने जीपमधून खाली उतरले पाहिजे. यावर स्नेहा जयकडे बघते. त्यावेळी जय संभ्रमात असतो की, नक्की कोणाच्या बाजूने निर्णय द्यावा. कारण इतर सदस्य हे जयच्या टीममधील आहेत, तर स्नेहा ही जयची चांगली मैत्रीण झाली आहे. त्यामुळे आता तो नक्की काय निर्णय देईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. (Bigg Boss Marathi 3 : nomination task is start but quarrel between sneha and adish)

याचसोबत स्नेहा आणि आदिशमध्ये आज पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. आदिशची एन्ट्री झाल्यापासून तो प्रत्येक सदस्याशी हुज्जत घालताना दिसत आहे, असे स्नेहाचे आणि इतर सदस्यांचे मत आहे. आदिशच्या येण्याने ‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये खळबळ उडाली आहे. सगळेच त्याच्याविषयी, तर काही त्याच्या विरोधात बोलू लागले आहेत. बिग बॉसने दिलेल्या कार्यामुळे आदिशबद्दल जय, उत्कर्ष आणि त्यांच्या ग्रूपमध्ये नकारात्मक भावना आहे, जी वेळोवेळी दिसून आली आहे. आदिश आणि जय नंतर आता स्नेहा आणि आदिशमध्ये देखील वाद होणार आहे. एका टास्कदरम्यान आदिश स्नेहाकडे चर्चा करायला जाणार आहे.

त्या चर्चेचे रूपांतर भांडणामध्ये होताना दिसत आहे. आदिशला स्नेहाच्या संतापजनक प्रतिक्रियेचा सामना करावा लागणार आहे, असं दिसत आहे. आदिशचं म्हणण आहे की, “तुझं वैयक्तिकरीत्या इरिटेशन असेल, पण प्रतिक्रिया अशी माझा इन्फ्लुएन्स, मी जे बोलत आहे ते देखील काऊंट होणार आहे.” यावर स्नेहाचे म्हणणे आहे की, “तुमचं इन्फ्लुएन्स माझ्यासाठी काऊंट होतं नाही, तुम्हाला असं वाटतं असेल. मी तुमच्याकडे यावं प्रतिक्रिया मागायला, तर तसं होणार नाहीये. मी काय विचारू.” या नंतर आदिशने देखील विचारले, “काय?” त्यानंतर हा वाद वेगळ्याच दिशेला गेला.

त्यामुळे बोलता बोलता झालेला त्यांचा हा वाद कुठपर्यंत जातोय हे बघण्यासाठी रोज रात्री ९: ३० वाजता ‘बिग बॉस मराठी ३’ कलर्स मराठीवर पाहावे लागणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नवरात्री २०२१: ‘मोहे रंग दो लाल’, म्हणत सुखदाकडून दिलखेचक फोटो शेअर, तर पती अभिजितची कमेंट ठरतेय लक्षवेधी

-तपकिरी रंगाच्या ड्रेसमध्ये खुललं स्पृहाचं सौंदर्य, पाहायला मिळाला अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज

-‘सौंदर्यासाठी लहान कपड्यांची गरज नाही…’, मराठमोळ्या मानसी नाईकची ‘ती’ पोस्ट आली चर्चेत

हे देखील वाचा