मराठी बिग बॉसचे तिसरे पर्व चांगलेच गाजत आहे. घरातील सदस्य रोज त्यांचा अतरंगी अवतार दाखवत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये देखील चांगलेच मनोरंजन होत आहे. अशातच चौथ्या आठवड्यात घरात बिबी कॉलेज हा टास्क रंगला आहे. घरात होणाऱ्या या टास्कमुळे या आठवड्यातील घरातील वातावरण अगदी हलके फुलके राहिले आहे. घरातील काही सदस्य शिक्षक तर काही सदस्य विद्यार्थी बनले आहेत. त्यामुळे घरात चांगलेच जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सगळे सदस्य एन्जॉय करत आहेत.
या टास्कमध्ये सुरेखा कुडची या शिक्षक बनल्या आहेत. त्या नृत्याचा तास घेत आहेत. अशातच या तासाला या शोमधील वाईल्ड कार्ड एन्ट्री आदिश वैद्य आणि सुरेखा कुडुची यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाले आहेत. यावर आदिश खूप चिडला आहे. जेव्हा सुरेखाचा तास चालू असतो तेव्हा आदिश मधे कायतरी बोलतो. तेव्हा सुरेखा म्हणतात की, “आदिश सरांना विनंती आहे की, त्यांनी मधे बोलू नये. ते आता आलेत घरात आणि आम्ही येऊन खूप दिवस झाले आहेत.” या नंतर त्या या घरात त्यांना टॉप फाईव्ह स्पर्धक कोण वाटतात हे सांगतात. (Bigg Boss Marathi 3 : quarrel between adish vaidya and surekha kudachi)
यानंतर आदिश बाहेर येऊन त्यांच्याबद्दल खूप बोलतो. यावेळी इथे विशाल, विकास, आविष्कार आणि सोनाली आहेत. त्यावेळी आदिश म्हणतो की, “या बाईला कालपर्यंत खेळायचं नव्हत. कालपर्यंत म्हणत होती की, मला काय जमणार नाही, काही होणार नाही. यानंतर तो सगळ्यांना म्हणतो की, वाईट वाटेल तुम्हाला पण तिने सरळ तुम्हा सगळ्यांची लायकी काढली आहे.”
यावर घरातील इतर सदस्य देखील त्याचे मत व्यक्त करतात. आदिश हा घरात आल्या दिवसापासून चर्चेत आहे. त्याच्यातील आत्मविश्वास देखील प्रेक्षकांना खूप आवडत आहे. परंतु आता इथून पुढे तो काय कमाल करणार आहे. हे पाहण्यासाठी सगळे उत्सुक आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–सनी लिओनीची लाडकी लेक झाली सहा वर्षांची, वाढदिवसानिमित्त गोंडस फोटो केले शेअर
–आदेशानंतरही ईडीच्या कार्यालयात हजर नाही झाली जॅकलिन, एजंसीने बजावला तिसरा समन्स