‘बिग बॉस मराठी’च्या घरात साप्ताहिक कार्य रंगले आहे. दर आठवड्याप्रमाणे या आठवड्यात देखील स्पर्धकांची भांडणे पाहायला मिळत आहेत. या आठवड्यात ‘डब्बा गुल’ हे साप्ताहिक कार्य रंगले आहे. या कार्यात बिग बॉसच्या घरात दोन कंपन्यांनी सामानासाठी ऑर्डर दिल्या आहेत. ज्या घरातील सदस्यांना पॅकिंग करून पाठवायच्या आहेत. यावेळी बिग बॉसने टीम बनवल्या आहेत. पहिल्या टीममध्ये जय, उत्कर्ष, दादूस, गायत्री, मीनल, नीथा, तर दुसऱ्या टीममध्ये विशाल, विकास, सोनाली, तृप्ती, स्नेहा आणि मीरा हे स्पर्धक आहेत.
घरातील सदस्यांना केवळ बॉक्स बनवायचे नाही, तर त्यांना दिलेल्या रिबीनने ते व्यवस्थित पॅक करून द्यायचे आहेत. यावेळी ‘ए’ टीमकडे लाल रंगाची रिबीन होती, तर ‘बी’ टीमकडे निळ्या रंगाची रिबीन होती. या टास्क दरम्यान दोन्ही टीममध्ये चांगलीच भांडण रंगली होती. यात जय आणि मीरामध्ये जोरदार भांडण झाली आहेत. (Bigg Boss Marathi 3 : quarrel between jay dudhane and meera jagnnath)
बॉक्सेस घेताना जय आणि मीरामध्ये वाद झाले यानंतर दोघेही खूप चिडतात. यानंतर मीरा म्हणते की, “हातावर बुक्क्या मारतात आणि नंतर म्हणायचं आम्ही मुलींना हात लावत नाही.” यावर जय म्हणतो की, “करायचं असतं तर भरपूर काही करू शकलो असतो.” यानंतर मीरा म्हणाते की, “सोनूला त्रास झाला आता मोठा दादा त्याला कुरावळणार.” यानंतर जय म्हणतो की, “आम्ही नीट खेळतो सात आठवडे आमच्याच जीवावर काढले.” त्यानंतर त्यांच्यातील वाद आणखीनच वाढतो.
मागच्या आठवड्यात चुगली बूथमध्ये जय आणि उत्कर्षचे नाव आल्याने मीरा आणि गायत्री त्यांच्यावर नाराज होत्या. तसेच त्यांचा ग्रूप देखील तुटला आहे. त्यांनी एकमेकांवर खूप संताप व्यक्त केला होता. तसेच उत्कर्षने या आठवड्यात गायत्रीला सेफ केल्यामुळे जय त्याच्यावर खूप चिडला होता. तसेच, ती इकडे- तिकडे जाऊन लगेच आपल्या विरोधात बोलेल तिच्यासाठी करून काही फायदा नाही असे सांगितले.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जांभळ्या रंगाची साडी, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर; तेजश्री प्रधानचा दिवाळी लूक पाहून चाहतेही फिदा
-‘रमाची खूप आठवण येतीये,’ म्हणत जितेंद्र जोशीने सांगितल्या त्याच्या आजीसोबतच्या गोड आठवणी
-वृत्तपत्राची एडिटर ते एक नावाजलेली अभिनेत्री, ‘असा’ आहे सोनाली कुलकर्णीचा अभिनयप्रवास