Tuesday, July 9, 2024

‘स्वतःला बिग बॉसच समजते’, मीरावर भडकल्या तृप्ती देसाई; ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पुन्हा एकदा राडा

‘बिग बॉस मराठी’चे तिसरे पर्व बघताना प्रेक्षकांना खूप आनंद होत आहे. कारण गेल्या दोन वर्षांपासून सगळेच या शोची आतुरतेने वाट बघत होते. अशातच हा शो सुरू होऊन दोन आठवडे उलटले आहेत. घरातील अनेक वादविवाद आपल्याला पाहायला मिळाले आहेत. या आठवड्यात घरातील दोन चर्चेत असणारे सदस्य म्हणजे मीरा जगन्नाथ आणि तृप्ती देसाई यांच्यामध्ये चांगलाच वाद झालेला दिसून आला आहे.

या आठवड्यात ‘जिंकू किंवा लढू’ या साप्ताहिक कार्यात टीम ‘ए’ विजयी झाली. त्यामुळे बिग बॉसने या आठवड्याच्या कॅप्टन पदासाठी ‘ए’ टीममधून दोन सदस्यांची नावे एकमताने जाहीर करण्यास सांगितले होते. मात्र, झाले असे की, टीम ‘ए’ मधील प्रत्येक सदस्यालाच कॅप्टन बनण्याची इच्छा होती. मीरा म्हणते की, “माझं नाव सुचवा,” तर तृप्ती म्हणत होत्या “माझं नाव पुढे करा.” टीममधील इतर सदस्यांना देखील कॅप्टन व्हायचे होते. परंतु तरीही ते निर्णय घेऊ न शकल्याने बिग बॉसने ही संधी ‘बी’ टीमला दिली. सुरुवातीला ‘बी’ टीममधील सगळेजण खूप खुश झाले. कारण त्यांना वाटले की, त्यांना त्याच्या टीममधील दोन सदस्य निवडायचे आहेत. परंतु त्यांना ‘ए’ टीममधील सदस्यांची नावे सुचवण्यास सांगितले. (Bigg Boss Marathi 3 : quarrel between trupti Desai and meera jagnnath)

त्यावेळी तृप्ती ताई म्हणाल्या की, “हे सगळं मीरामुळे झाले आहे.” तसेच त्या म्हणतात की, “मी पलटी मारली नाही.” त्यावेळी मीरा खूपच चिडते आणि त्यांना बोलू लागते की, “पलटी हा शब्द तुमच्यासाठी वापरला नाही मी.” यावर तृप्ती म्हणतात की, “आवाज वाढवला नाही मी. नीट बोलायचं माझ्याशी. किती शब्द फिरवता तुम्ही, स्वतःला बिग बॉस समजता. मला आज समजलं महेश सर हिला का बोलतात एवढं. मला वाईट वाटायचं, पण ते बरोबर आहेत. हिला असं वाटतं की, ती एकटीच खेळायला आली आहे.” यावर मीरा देखील त्यांना प्रत्युत्तर देते.

‘बी’ टीमने ‘ए’ टीममधील विशाल आणि जयचे नाव कॅप्टन पदाच्या उमेदवारीसाठी सुचवले. त्यांच्यात ‘डान्स पे चान्स’ हे कॅप्टन्सी कार्य देखील पार पडले. परंतु एवढं सगळं होऊनही पुढच्या आठवड्याचा कॅप्टन कोणीही बनू शकले नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस मराठी’च्या घरात रंगला ‘फळ की निष्फळ’ टास्क, पाहायला मिळाली सदस्यांमधील जुगलबंदी

-‘हे नक्की शाल्विताच का?’ ओम अन् स्वीटूच्या ‘त्या’ व्हिडिओवर रंगल्यात चाहत्यांच्या चर्चा

-उफ्फ! ‘बानू’च्या नजरेच्या बाणाने थेट केला चाहत्यांच्या काळजावर वार, पाहा व्हिडिओ

हे देखील वाचा