Tuesday, July 9, 2024

‘यमक हीच तुमच्या लाईफची चमक’, ‘बिग बॉस मराठी ३’च्या घरात रंगणार यमकची जुगलबंदी

प्रेक्षकांच्या आवडीचा आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणजे ‘बिग बॉस मराठी ३’ होय. या पर्वातील आजचा म्हणजेच गुरुवार (३० सप्टेंबर) हा नववा दिवस आहे. या शोमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून सामील झाले आहेत. मागील दोन दिवसांपासून शोमध्ये हल्ला बोल टास्क सुरू आहे. या टास्कमुळे बिग बॉसच्या घरातील वातावरण चांगलेच तणावात असल्याचं दिसत आहे.

याव्यतिरिक्त सदस्यांचा शब्दांचा मारा ऐकायला येत आहे. मात्र, दादूस म्हणजेच संतोष चौधरी घरातील वातावरण हलकंफुलकं करण्याचं कामं सुरुवातीपासून करत आले आहेत. कधी हसू आणतात, तर कधी डोळ्यात पाणी आणतात. गुरुवारी (३० सप्टेंबर) ‘बिग बॉस मराठी’च्या घरात यमकची जुगलबंदी रंगणार आहे. (Bigg Boss Marathi 3 Rhyme juggling In Halla Bol Task)

विशेष म्हणजे याची सुरुवात आविष्कारपासून झाली आहे. आविष्कारने मायक्रोवेव्हमध्ये अंडी उकाडायला ठेवली, पण त्यात पाणीच ठेवायला विसरला. त्यावरून दादूस यांची वाक्य सुरू झाली, “आविष्कारने केला अंड्याचा ब्लास्ट, हा त्याचा चान्स होता लास्ट.” त्यावर मग तृप्ती देसाईदेखील म्हणाल्या की, “पण, मीनल आणि सोनाली करते आहे काम फास्ट”. दादूस लगेच म्हणाले की, “यमक हीच तुमच्या लाईफची चमक.” त्यानंतर मग सोनाली पाटील देखील म्हणते की, “आता आमच्यासमोर कोणाची बोलायची नाही धमक.” तृप्ती यांना लगेच टास्कमधलं काहीतरी आठवतं आणि त्या म्हणतात, “म्हणून तुम्ही काल टाकलं का नमक?” अशाप्रकारे अनेक सदस्य यमक जुळवताना दिसणार आहेत.

ही जुगलबंदी दादूस, तृप्ती देसाई, मीनल, सोनाली, आविष्कार या सदस्यांमध्ये रंगली आहे. आता अजून पुढे काय काय होतं ते आजच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-किर्तनकार शिवलीला पाटील बिग बाॅस मराठीच्या घराबाहेर? पाहा काय आहे नक्की प्रकरण

-पर्सच्या निमित्ताने पुन्हा रंगला अनुपम खेर आणि त्यांच्या आईमध्ये मजेशीर संवाद

-‘या’ कलाकारांनी बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी निर्मात्यांकडून घेतले होते बक्कळ पैसे

हे देखील वाचा