Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘आल्या आल्या आम्हाला त्रास दिला’, म्हणत पहिल्याच दिवशी स्नेहाने आदिशवर केली नाराजी व्यक्त

बिग बॉस मराठीच्या घरात अनेक नवीन वळणं आपण मागील एक आठवड्यापासून पाहिली आहेत. घरातील सदस्य शिवलीला पाटील हिने घरातून एक्झिट घेतली. त्यानंतर या आठवड्यात अभिनेता अक्षय वाघमारे हा घरातून एलिमिनेट झाला आहे. यासोबत मोठी गोष्ट म्हणजे घरात पहिली वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे. बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात अभिनेता आदिश वैद्यची एंट्री झाली आहे. आदिश हा बिग बॉसच्या पर्वातील पहिलाच सदस्य असेल जो तिसऱ्याच आठवड्यात घरात आला आहे.

आदिश घरात येताच बिग बॉसने त्याच्यावर एक महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्याला टेंम्प्टेशन रूममधील पॉवर कार्ड स्वीकारण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. याद्वारे तो पुढच्या आठवड्याचा कॅप्टन बनू शकतो. पण यामुळे घरातील रहिवाशांना नुकसान सहन करावे लागणार आहे. आदिशला घरातील तीन सदस्यांची नावे निवडायची आहेत. त्या सदस्यांना बिग बॉसच्या पुढच्या आदेशापर्यंत रात्री जागून घराची राखण करायची आहे. यावेळी आदिश हे पावर कार्ड स्वीकारतो. (Bigg Boss Marathi 3 : sneha get upset on wild card contestant adish vaidya)

आपल्या सगळ्यांना सोमवारी (११ ऑक्टोबर) भागात पाहायला मिळणारा आहे की, स्नेहा आदिशवर नाराज झाली आहे. यावेळी स्नेहा, सुरेखा आणि आदिश डायनिंग टेबलवर बसलेले असतात. आदिश खात असतो. तेव्हा त्यांच्यामध्ये संभाषण झाले आहे.

स्नेहा आदिशला म्हणाली की, “आल्या आल्या त्रास दिला तुम्ही सगळ्यांना. जसं की आमचे तीन लोकं जखमी केले.” त्यावर आदिश म्हणाला की, “कुठलेतरी तीन होणारच होते. जर तू माझ्या जागी असतीस तर काय केलं असतं?” यावर स्नेहा म्हणाली की, “माझी पद्धत वेगळी असती. मी वेगळ्या पद्धतीने डील केलं असतं. म्हणजे माझ्या पध्दतीने मी डील केलं असतं. हे गरजेचं नाही की, आपल्या गोष्टीने समोरच्याला त्रास झालाच पाहिजे, त्याचा त्रास कमी करू सुद्धा गोष्टी करू शकतो.” यावर आदिश म्हणाला की, “ त्या दृष्टीने मी पूर्ण प्रयत्न केला आहे.”

यापुढे आता घरात काय होणार आहे, आदिश या निर्णयामुळे घरात आणखी काय राडे होणार आहेत हे पाहण्यासाठी बिग बॉस प्रेमी उत्सुक आहेत.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

नादच खुळा! अमिताभ बच्चन यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहणाऱ्या बॉडीगार्डला मिळतो ‘इतका’ पगार; आकडा तर वाचा…

अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण

सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे

हे देखील वाचा