‘बिग बॉस मराठी’च्या घरात आठव्या आठवड्याचे नॉमिनेशन कार्य नुकतेच पार पडले आहे. मागच्या आठवड्यात घरातून तृप्ती देसाई यांची एक्झिट झाली आहे. त्यांची एक्झिट सगळ्यांसाठी अनपेक्षित होती. त्यामुळे सगळेच खूप नाराज झाले. अनेक सदस्यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या जाण्याने आता कोणीही घरातून जाऊ शकते अशी सगळ्यांना भीती वाटत आहे.
अशातच घरात नॉमिनेशन कार्य पार पडले आहे. यामध्ये बिग बॉसने गार्डन एरियामध्ये काही क्रमांक ठेवले. यावर सदस्यांनी येऊन उभे राहायचे होते. बिग बॉसने हे क्रमांक ठेवल्यावर घरातील सदस्य येतात आणि त्यांना जे क्रमांक भेटतील त्यावर उभे राहतील. यात स्नेहा वाघ पळत येते आणि पहिल्या क्रमांकावर उभी राहते. तसेच इतर सदस्य नंतर उभे राहतात. शेवटी उत्कर्ष, जय आणि विशाल उभे असतात. त्यामुळे त्या तिघांनी पहिल्या तीन क्रमांकावर उभे राहावे अशी सगळ्यांची इच्छा असते. त्यावेळी सगळ्यांचे खूप वाद होतात, परंतु स्नेहा काही तिचा क्रमांक सोडायला तयार नव्हती. (Bigg Boss Marathi 3 : sneha wagh get aggressive in nomination task)
तिला तो क्रमांक सोडण्यासाठी सगळेच खूप विचारतात पण ती कोणाचेही काहीच ऐकून घेण्यास तयार नव्हती. त्यावेळी विशाल तिला म्हणतो की, “स्नेहा टास्कमध्ये खेळत नाही.” यावर स्नेहा खूप चिडते आणि म्हणते की, “मारामारी म्हणजे टास्क खेळणे नाही.” यावर विशाल म्हणतो की, “तुमच्या कॅप्टन टास्कमध्ये मी खूप केलं माझा पाय अडकला होता.” यानंतर देखील स्नेहा कोणाचेही काहीच ऐकण्यास तयार नसते ती म्हणते की, “मला माझे हात पाय तोडून बाहेर जायचे नाही.” बाकी अनेक लोक तिला समजवण्याचा प्रयत्न करतात, परंतु ती काही तिचा पहिला क्रमांक शेवटपर्यंत सोडत नाही.
यावेळी बिग बॉसच्या घरात विशाल, जय, उत्कर्ष, दादूस, विशाल, निथा आणि सोनाली हे सदस्य निमिणे झाले आहेत. सगळ्यांनी पुढचा प्रयत्न मिळवायचा खूप प्रयत्न केला परंतु स्नेहाने कोणाचेही काहीच ऐकले नाही. त्यामुळे हे सहाजण नॉमिनेट झाले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-