Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘समोर येऊन बोलायची हिंमत नाही कोणाची…’ रडत रडत विशालजवळ व्यक्त झाली स्नेहा

‘बिग बॉस मराठी’च्या घरात नुकतेच कॅप्टन्सी टास्क पार पडले आहे. या टास्कमध्ये स्नेहा वाघ आणि तृप्ती देसाई या उमेदवार होत्या. या दोन्हींमध्ये हा टास्क पार पडला आहे. या टास्कमध्ये तृप्ती आणि स्नेहा या दोघींची टीम वेगवेगळी नेमून दिलेली असते. यावेळी टास्क दरम्यान तृप्ती यांना पायाला दुखापत होते. त्यामुळे बिग बॉस त्यांना कार्यात सहभागी न होण्याचा आदेश देतात. यावर त्यांचे समर्थक त्यांचा हा टास्क खेळतात.

या टास्क वेळी जास्तीत जास्त ट्रॉफी मिळून स्नेहाची टीम विजयी होते. यानंतर या टास्कच्या संचालिका सोनाली आणि गायत्री तिच्या टीमला विजयी घोषित करतात. त्यावेळी बिग बॉस सांगतात की, पुढच्या आठवड्याची कॅप्टन स्नेहा झाली आहे. यानंतर तृप्ती तिला टोमणे देत, आम्ही इतरांच्या जीवावर कॅप्टन झालो नाही असे म्हणतात. यावर स्नेहा खूप दुखावते आणि वॉशरूममध्ये जाऊन रडत बसते. नंतर तिथे विकास जातो, तेव्हा स्नेहा रडून त्याच्याकडे मन मोकळे करते. (Bigg Boss Marathi 3 : sneha wagh open up in front of vikas patil)

ती म्हणते की, “माझ्या व्यक्तीने दुखावलंय मला. जर समोरून येऊन बोलायची हिम्मत असते तर येऊन बोलले असते ना पण ती हिम्मत नाही ना कोणाची. जर तुम्हाला स्पर्धाच करायची आहे तर करा ना.” या नंतर ती खूप रडते. तसेच घरात शक्तीपदक मिळवण्यासाठी देखील टास्क झाला. त्यावेळी उत्कर्ष आणि विकासमध्ये हा टास्क झाला. यावेळी उत्कर्ष हा विजेता झाला आणि त्याला टेम्प्टेंशन रूममध्ये जाण्याची संधी मिळाली.

त्यावेळी त्याला पावर कार्ड मिळाले आणि त्याला पुढच्या आठवड्यात सुरक्षित होण्याची संधी मिळाली. परंतु जर त्याने हे पावर कार्ड स्वीकारले तर त्याला घरातील एका सदस्याला नॉमिनेट करावे लागणार होते. तेव्हा तो हे पावर कार्ड स्वीकारतो आणि विशाल निकमला पुढच्या आठवड्यासाठी थेट नॉमिनेट करतो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-निलेश साबळेचा होणार पत्ता कट, ‘ही’ अभिनेत्री करणार ‘चला हवा येऊ द्या’चे सूत्रसंचालन?

-शिव ठाकरे अन् जुईली वैद्यच्या डान्सवर टायगर श्रॉफही झाला फिदा, कमेंट करत म्हणाला…

-भारीच की! ‘ही’ अभिनेत्री असणार ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील दुसरी वाईल्ड कार्ड एन्ट्री

हे देखील वाचा