Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

जय की विशाल? कॅप्टन्सी कार्यात कोण असेल स्नेहा वाघची निवड?

‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘पारडे कॅप्टन्सी’चे हे साप्ताहिक कार्य चालू आहे. मागील आठवड्यात साप्ताहिक कार्यात विजयी होऊन जय आणि विशाल हे कॅप्टन्सी पदाचे उमेदवार झाले होते. साप्ताहिक कार्य नेहमीपेक्षा बऱ्यापैकी सोप्पे होते. परंतु कॅप्टन्सी टास्क एका वेगळ्याच पद्धतीचा होता. ज्याचा विचार घरातील कोणत्याच सदस्याने केला नव्हता. अगदी प्रेक्षकांना देखील या टास्कची काही कल्पना नव्हती.

यावेळी घरातील सदस्यांना कॅप्टन बनण्यासाठी समोरील दोन सदस्यांना जर पाठिंबा द्यायचा असेल, तर त्यांना त्यांच्या जवळील काही गोष्टी गमवाव्या लागणार होत्या. परंतु त्या गोष्टी कोणत्या असणार हा निर्णय बिग बॉस घेतात. यावेळी बिग बॉस घरातील सदस्यांना वेगवेगळ्या गोष्टींचा त्याग करायला सांगतात. जर घरातील सदस्याने ती गोष्ट मान्य केली, तर त्याला एक माप देऊन ज्याला पाठींबा द्यायचा आहे त्याच्या पारड्यात टाकायचे आहे. (Bigg Boss Marathi 3 : sneha wagh’s one vote is important for Vishal and jay to make captain)

यावेळी जयच्या पारड्यात चार मापं आणि विशालच्या पारड्यात पाच मापं असतात. परंतु घरातील एका सदस्याचे मत राहिलेले आहे. ती सदस्य म्हणजे स्नेहा वाघ. अजूनही स्नेहा वाघने कोणाला मत दिले नाही. यावेळी विशाल तिला मत देण्यासाठी विचारतो आणि म्हणतो की, “स्नेहा मी मनापासून मानतो तुम्हाला. आधीही मी होतो तुमच्या बरोबर आणि इथून पुढे पण राहिल. माझं प्रेम असंच आहे.” यानंतर स्नेहा म्हणते की, “विशाल तुम्ही माझं मन जिंकले आहे.”

यानंतर स्नेहा तिचे माप टाकायला तराजूजवळ जाते परंतु ती नक्की कोणाला तिचे मत देणार आहे ही गोष्ट अजूनही समोर आली नाही. त्यामुळे आता येणाऱ्या एपिसोडमध्ये हे पाहणे महत्वाचे आहे की, स्नेहा नक्की कोणाला मत देणार आणि या आठवड्याचा घरातील कॅप्टन कोण होणार आहे?

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा