बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व सुरू होऊन आता ५० दिवस पूर्ण झाले आहेत. घरात वेगवेगळे गेम प्लॅन सुरू आहेत. नुकतेच घरातून सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांची एक्झिट झाली आहे. घरातून तृप्ती देसाई बाहेर गेल्यामुळे घरातील सगळ्याच सदस्यांना खूप वाईट वाटले आणि त्यांना अश्रू अनावर झाले. दर वीकेंडला घरात सदस्यांचे नवनवीन ड्रेस पाहायला मिळतात. हा शो जसजसा पुढे तसतसे या शोबाबत अनेक खुलासे होत आहेत. या वीकेंडला सगळ्यांनी दिवाळी स्पेशल एपिसोड साजरा केला आहे. त्यामुळे घरातील सदस्य पारंपरिक वेशात दिसत होते.
सगळेच अगदी सुंदर दिसत असल्याने सोशल मीडियावर कलाकारांच्या लूकचे खूप कौतुक झाले. अशातच स्नेहा वाघचे वीकेंडच्या चावडीवरील काही फोटो समोर आले आहेत. जे फोटो आणि व्हिडिओ पाहून प्रेक्षकांच्या मनात बिग बॉस या शोवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ( Bigg Boss Marathi 3 : sneha wagh’s professional photoshoot viral on social media)
स्नेहा वाघच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे वीकेंड चावडीवरील काही प्रोफेशनल फोटो व्हायरल झाले आहेत. तसेच ती तयार होताना एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. हे प्रोफेशनल फोटोशूट पाहून प्रेक्षकांच्या मनात बिग बॉसबाबत अनेक प्रश्न पडले आहेत. अनेकांना हा शो स्क्रिप्टेड आहे असे वाटत आहे. अनेकजण या फोटो आणि व्हिडिओवर कमेंट करून त्यांचे मत मांडत आहेत.
एका युजरने कमेंट केली आहे की, “फेक स्क्रिप्टेड आहे बिग बॉस, मोबाईल वापरायला बंदी आहे तरी रिल्स कसे काय करतात?” दुसऱ्या एकाने लिहिले आहे की, “बिग बॉसमध्ये असताना असे व्हिडिओ कसे काय बनवतात.” आणखी एकाने लिहिले आहे की, “हे बिग बॉस वाले लोकांना पागल समजतात का?” एकाने लिहिले आहे की, “खोटा शो आहे, सगळं स्क्रिप्टेड आहे.”
अशाप्रकारे अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देता आहेत. बिग बॉसच्या घरात कोणतेही बाहेरच्या व्यक्तीला येण्यास परवानगी नाही तर मोबाईल वापरण्यास परवानगी नाही मग हे असे व्हिडिओ आणि फोटो कसे काय काढू शकतात? असा सगळ्यांना प्रश्न पडला आहे. स्नेहा वाघ ही बिग बॉसच्या घरात आल्यापासूनच खूप चर्चेत होती. तिचा पूर्व पती आविष्कार दार्व्हेकर देखील या घरात असल्याने त्यांच्या पूर्व आयुष्यावर अनेक माहिती समोर आली. काही दिवसांपूर्वी आविष्कार घरातून बाहेर गेला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-