Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

बिग बॉस मराठीच्या घरात वाहू लागले प्रेमाचे वारे, सोनाली आणि विशालमध्ये दिसली रोमँटिक केमिस्ट्री

बिग बॉस मराठीच्या घरात दर आठवड्यात नवनवीन टास्क पाहायला मिळतात. बिग बॉसच्या घरात आता चौथा आठवडा चालू झाला आहे. या आठवड्यात घरात ‘बिबी कॉलेज’ हा टास्क सुरू आहे. कॉलेजचे दिवस हे आपल्या आयुष्यातील अत्यंत सुंदर आणि लक्षात राहणारे दिवस असतात. याच दिवसात आपण खरं आपलं आयुष्य जगत असतो. याचाच आधार घेऊन बिग बॉसने हा टास्क घेतला आहे. यात घरातील काही सदस्य शिक्षक तर काही सदस्य विद्यार्थी बनले आहेत. बिग बॉसने नेमून दिलेले सदस्य त्यांच्या भूमिका निभावत आहेत. तसेच प्रत्येक शिक्षकाला त्यांचा एक विषय दिला आहे. ज्यावर त्यांना विद्यार्थांना शिकवायचे आहे.

बिग बॉसच्या घरात सोनाली पाटील हिला प्रेमाची केमिस्ट्री हा विषय दिला आहे. ती बिबी कॉलेजमधील विद्यार्थ्यांना प्रेमाचे धडे देताना दिसली आहे. बिबी कॉलेजमध्ये जेव्हा सोनालीचा प्रवेश होतो तेव्हा सगळेच खूप खुश होतात. पण यात सगळ्यात जास्त खुश विशाल होतो. विशाल तिला बघत उभाच राहतो. यानंतर सोनाली आपण आपल्या आयुष्यात कसे प्रेमात पडतो हे सांगत असते. तेव्हा ती आपण कॉलेजमध्ये गेल्यावर कशाप्रकारे प्रेमात पडतो हे सांगत असते. तेव्हा ती विचारते की, “माझ्यासोबत कोण करून दाखवेल.” तेव्हा अनेकजण हात वर करतात. पण ती म्हणते की, “विशालने आधी हात वर केला आहे.” त्यानंतर त्यांच्यातील रोमँटिक केमिस्ट्री सगळ्यांना पाहायला मिळते. (Bigg boss Marathi 3 : Sonali Patil and Vishal nikam’s romantic chemistry in BB house)

यानंतर तास संपताना सोनाली विशालला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून स्टार देखील देते. या आठवड्यात शिक्षकांना त्यांचा तास संपल्यावर एक चांगला विद्यार्थी म्हणून स्टार द्यायचा आहे तर विद्यार्थांना एक मताने एका शिक्षकाला स्टार द्यायचा असतो. असे सर्वोत्कृष्ट दोन विद्यार्थी आणि एक शिक्षक असे निवडायचे आहे. या तीन स्पर्धकांमध्ये पुढच्या आठवड्याच्या कॅप्टन पदासाठी डाव रंगणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

सनी लिओनीची लाडकी लेक झाली सहा वर्षांची, वाढदिवसानिमित्त गोंडस फोटो केले शेअर

आदेशानंतरही ईडीच्या कार्यालयात हजर नाही झाली जॅकलिन, एजंसीने बजावला तिसरा समन्स

भारीच ना! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय, ऐकून नाचू लागतील चाहते

हे देखील वाचा