Saturday, July 6, 2024

‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वातून सुरेखा कुडची यांची एक्झिट, मांजरेकरांनी दिला ‘हा’ खास अधिकार

‘बिग बॉस मराठी’च्या घरात येऊन सगळ्या सदस्यांना आता चार आठवडे पूर्ण झाले आहेत. दर आठवड्याला आता घरातून एकेक स्पर्धक बाहेर जात आहे. मागच्याच आठवड्यात अक्षय वाघमारे हा घराबाहेर गेला आहे. या आठवड्यात देखील नॉमिनेशन टास्क झाला. यामध्ये मीनल, दादूस, सोनाली, सुरेखा, विकास, विशाल, स्नेहा तृप्ती हे सगळे सदस्य नॉमिनेट होते. त्यामुळे आता या आठवड्यात घरातून कोण बाहेर जाईल, हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक होते.

मागील आठवड्यात घरात बीबी कॉलेज हा टास्क रंगला होता. या टास्कमध्ये सगळ्यांनीच एन्जॉय केले. घरात बनलेले शिक्षक तसेच विद्यार्थी या सगळ्या गोष्टी खूप आनंदाने एन्जॉय करत होते. वीकेंडला मांजरेकरांनी ज्यांनी या आठवड्यात चांगले काम केले त्यांचे भरभरून कौतुक केले. परंतु ज्यांनी काम नीट केले नाही, त्यांना मात्र खडेबोल सुनावले. या आठवड्यात एलीमिनेशन होते. यावेळी मांजरेकरानी जे लोक या आठवड्यात सुरक्षित आहेत, त्यांची नावे घेतली. या नंतर त्यांनी डेंजर झोनमध्ये असणाऱ्या दोन व्यक्तींना समोर बसलेले. त्यावेळी स्नेहा आणि सुरेखा या होत्या. (Bigg Boss Marathi 3 : surkeha kudchi is eliminated in this week, Manjrekar give special right to her)

ज्यावेळी त्यांनी घरातील सदस्यांना कोण सुरक्षित असेल असे विचारले, तेव्हा अनेकांनी स्नेहाचे नाव घेतले होते. परंतु मांजरेकरांनी तेव्हा सांगितले की, सुरेखा कुडची या घरातून बाहेर गेल्या आहेत. त्यावेळी घरातील सगळ्यांनाच खूप दुःख होते. सगळेजण खूप रडतात. यात स्नेहा खूप जास्त रडते. सुरेखा घराच्या बाहेर आल्यानंतर मांजरेकर त्यांना त्यांचा बिग बॉसच्या घरातील त्यांचा प्रवास सगळ्यांना दाखवतात. त्यांचा हा प्रवास बघताना त्या खूपच भारावून जातात. यांनतर ते सुरेखा कुडची यांना घरातील या आठवड्याचे कॅप्टन कोण असेल याची निवड करण्यास सांगतात. त्यावेळी त्या तृप्ती यांचे नाव घेतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ऋता आणि अजिंक्यचा रेड कार्पेटवरील डान्स व्हिडिओ व्हायरल; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती गोड!’

-‘अशक्य सुंदर’, अमृता खानविलकरचा फोटो पाहून चाहते तर सोडाच, कलाकारांनीही पाडला कमेंट्सचा पाऊस

-‘कुछ कुछ होता है अभ्या…’, म्हणत ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षयाने मजेशीर फोटो केले शेअर

हे देखील वाचा