Tuesday, July 9, 2024

Bigg Boss Marathi 3: ‘राम राज्य येईल बिग बॉस, तुम्ही…’, विकास पाटीलने भावना केल्या व्यक्त

सध्या टीव्हीवरील सर्वात चर्चेत असलेला मराठी शो म्हणजे ‘बिग बॉस मराठी’ होय. या शोने दोन वर्षानंतर पुनरागमन केले आहे. विशेष म्हणजे बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व सुरू असून शोला चाहत्यांचा जोरदार प्रतिसादही मिळत आहे. या शोमध्ये दोन गट पडले आहेत. एक ए आणि दुसरा बी. हेच गट हल्लाबोल टास्कमध्ये निवडण्यात आले होते. यातील विकास पाटील आणि विशाल निकमचा गट बिग बॉसच्या घरातील काम करत आहे. मात्र, दुसरा गट हा काम करत नाही, असं त्यांना वाटत आहे. अशामध्येच विकास पाटीलने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

विकास पाटील जेवणाच्या टेबलवर बसलेला असतो. यावेळी तो आपल्या भावना व्यक्त करत म्हणतो की, “बिग बॉस घरात राम राज्य येईल.” आज विकास घरामध्ये थेट बिग बॉस यांच्याशी संवाद साधणार आहे. विकास आणि विशाल अशीच कोणत्या तरी मुद्द्यावर चर्चा करत असताना अचानक विकास पाटील म्हणतो की, “आता जरी रावणाचं राज्य असलं, तरीही एक ना एक दिवस राम राज्य येईल बिग बॉस काळजी करू नका.” (Bigg Boss Marathi 3 Vikas Patil Says Ram Rajya Will Come Soon)

तसेच पुढे बोलताना तो म्हणाला की, “सत्याच्या बाजूने आम्ही उभे आहोत आणि ही लढाई आम्ही जिंकणार.” मीनल देखील म्हणते की, “मला आंदोलन करायचं आहे. जी तानाशाही सुरू आहे त्याच्याविरोधात.” विकास पुढे म्हणतो की, “बघना सकाळपासून फक्त आपणच काम करतो आहे आणि ते काय करत आहेत?, गेम खेळत आहेत. अख्खा महाराष्ट्र बघतो आहे बिग बॉस.”

आता यावर चर्चा पुढे किती रंगली? कोणाचं काय म्हणणं आहे? हे सर्व आजच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. ‘बिग बॉस मराठी’चे तिसरे पर्व दररोज रात्री ९.३० वाजका कलर्स मराठीवर पाहायला मिळेल.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Video: ‘बिग बॉस मराठी ३’मध्ये जय आणि गायत्रीला बाईकवरून उतरवताना अक्षय आणि विशालमध्ये वादाची ठिणगी

-‘यमक हीच तुमच्या लाईफची चमक’, ‘बिग बॉस मराठी ३’च्या घरात रंगणार यमकची जुगलबंदी

-किर्तनकार शिवलीला पाटील बिग बाॅस मराठीच्या घराबाहेर? पाहा काय आहे नक्की प्रकरण

हे देखील वाचा