बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांमध्ये कुठल्या ना कुठल्या कारणामुळे वादविवाद होताना दिसत असतात. हे सदस्य कधीही भांडण, मतभेद विसरून एकमेकांना साथ देताना दिसतात, तर कधी कधी ते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले दिसतात. बिग बॉस मराठीचं हे घर प्रत्येक सदस्याला त्याची नव्याने ओळख करून देत असं म्हणायला हरकत नाही. बिग बॉस जेव्हा सदस्यांना एखादा टास्क देतात तेव्हा त्या टास्कचा एक संचालक देखील नेमून देतात. कधी हा संचालक फेअर आहे असं म्हणतात तर कधी अनफेअर आहे असं म्हणतात.
घरात जेवढी लोकं तेवढी मतं असल्याने कोणाला संचालक फेयर वाटतात तर कधी अनफेयर. बिग बॉसच्या आगामी भागामध्ये विकास अक्षयवर थोडा नाराज दिसणार आहे. नवीन होणार्या टास्कचा अक्षय संचालक आहे. अक्षयने असा कोणता निर्णय घेतला ज्यामुळे विकास त्याच्यावर इतका नाराज झाला आहे. हे बिग बॉसच्या आगामी भागामध्ये समजेलच. मात्र बिग बॉसचा प्रोमो पाहून विकास आणि विशाल एकमेकांवर जोरात ओरडताना दिसत आहे. त्यांच्यात नक्की एवढा वाद का झाला जे समजण्यासाठी बिग बॉस पाहावे लागेल.
विकास आणि मीनलमध्ये आजच्या भागामध्ये या विषयावर चर्चा होणार आहे. मीनल विकासला सांगणार आहे “तू कितीही जीव तोड, काहीपण कर unfair होणार आहे. काही फायदा नाहीये यांच्यावर एनर्जी घालवून. तू तुझा मुद्दा मांड जो पण आहे, शेवटी तेच होणार आहे जे त्यांना हवं आहे. त्यामुळे स्वत:ला त्रास करून नको घेऊस. मी राडा करत होती, पण मला कोणीच पाठिंबा दिला नाही. आता मी कसे करू. मी माझी युक्ती लावत होती, पण कोणीच मला सपोर्ट नाही केला. सर्व माझ्या विरोधात होते.” विकास म्हणाला, “अक्षय काय कामाचा आहे. कशाला त्याला संचालक केलं आहे. सगळे असेच आहे, राडपाणी सुरु कर. आपण फेअर खेळू आणि हारू. मी तुला पाठिंबा देत होतो.”
बिग बॉसमध्ये स्पर्धक दररोज आपले रंग दाखवत आहेत. त्यामुळे प्रेक्षकही या शोकडे आकर्षित होत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बोल्ड ऍंड ब्यूटीफुल! सई ताम्हणकरच्या हॉटनेसने नेटकरी झाले पुरते वेडे; फोटोवर पडतोय लाईक्सचा पाऊस
-‘हम दो हमारे दो’ सिनेमामुळे प्रेक्षकांची ही दिवाळी ठरणार ‘फॅमिलीवाली’