Friday, July 5, 2024

‘या’ कारणामुळे विशाल निकमला कोसळले रडू, घरात केली ‘ही’ मोठी घोषणा

‘बिग बॉस‌ मराठी’च्या तिसऱ्या पर्वात आता घरातील स्पर्धकांना ६० दिवस पूर्ण झाले आहेत. सुरुवातीपासूनच घरात दोन गट पडले आहेत. त्यांच्यात चांगली गट्टी देखील जमली आहे. त्यामुळे स्पर्धक घरातील त्यांच्या मित्रांसोबत असतात. परंतु बऱ्याचवेळा स्पर्धक त्यांच्या मित्रांबद्दल मागून बोलत असतात. त्या गोष्टी मांजरेकर वीकेंडला सांगतात किंवा चुगली बूथमध्ये या सगळ्या गोष्टी स्पर्धकांना समजतात. अशातच घरात वीकेंडचा डाव रंगला आहे.

यावेळी मांजरेकर सगळ्यांना ओरडताना दिसत आहेत. घरातील सदस्यांनी या‌ आठवड्यात ज्या काही गोष्टी केल्या आहेत. त्याबद्दल त्यांना जाब विचारले, तर अनेकांना खडेबोल सुनावले आहे. अशातच वीकेंड चालू होण्याआधीच घरातील सगळ्यात जवळचे मित्र सोनाली आणि विशालमध्ये काही वाद होतात. दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते. कोणीही कोणाचे ऐकून घेत नव्हते. त्यामुळे ग्रुपमध्ये पुन्हा एकदा तडा गेलेला दिसून आलेला आहे. विशाल, विकास, सोनाली आणि मीनल यांच्या ग्रुपला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत आहे. त्यांची मैत्री देखील सगळ्यांना आवडत आहे. (Bigg boss Marathi 3 : Vishal nikam crying in bigg boss Marathi house)

यावेळी वीकेंडला मांजरेकर विशालला विचारतात की, “तू मीनल आणि सोनाली यांच्याशी का सारखा भांडत असतो. त्या बिचाऱ्या तुझ्याशी नीट बोलतात पण नेहमी त्यांच्यावर ओरडत असतो आणि स्नेहाशी मात्र मस्त बोलतो एकदम.” यावर विशालला खूप वाईट वाटले. तो हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो की,” जर माझ्या ग्रुपमधला कोणी चुकला तर मी त्याला सांगणारच ना!”

यानंतर विशाल खूपच दुखावतो तो बेड रूममध्ये जाऊन एकटाच रडतो आणि म्हणत असतो की, “जवळची माणसं जास्त त्रास देतात. कोणी नाही इथे माझं, मी कोणत्याही ग्रुपचा हिस्सा नाही आतापासून.” त्याची ही भावनिक बाजू पाहून सगळ्याना रडू कोसळले आहे. त्यामुळे आता त्यांचा ग्रुप तुटेल की नव्याने पुन्हा जोडला जाईल हे पाहण्यासाठी सगळे उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रभास अन् पुजा हेगडेचा ‘राधे श्याम’ रिलीझपूर्वीच लीक! ‘अशी’ काहीशी आहे चित्रपटाची कथा

-दहावीत असताना होती पहिली गर्लफ्रेंड, चित्रपटांप्रमाणेच रंगतदार होती कार्तिक आर्यनची लव्हलाईफ

-अरे वा! अखेर ‘देवमाणूस’चा पुढचा भाग येणार प्रेक्षकांच्या भेटीला, सोशल मीडियावर प्रोमो व्हायरल

हे देखील वाचा