‘बिग बॉस मराठी’च्या घरात आपण दररोज काही नवनवीन घटना पाहत असतो. घरात सुरुवातीपासूनच प्रत्येकाने आपला ग्रूप बनवला आहे. त्यात त्यांना आनंद मिळतो, त्यांच्या मित्रासोबत ते राहतात. घरात सोनाली आणि विशाल यांचं समीकरण काही वेगळचं आहे. ते म्हणतात ना, ‘मैत्रीच्या थोड पलीकडे आणि प्रेमाच्या थोड अलीकडे’ असेच काहीसे या दोघांमध्ये दिसून आले आहे. त्यांची भांडणं, रुसवे, फुगवे प्रेक्षकांना खूप आवडतात. एकमेकांची काळजी करणे, तेवढंच हक्काने ओरडणे त्याच्यातील या गोष्टी सगळ्यांना खूप आवडतात.
केवळ मैत्री असली, तरी प्रेक्षकांना त्यांच्यात कुठे तरी प्रेमाचे बंध खुलताना दिसले आहेत. सोशल मीडियावर देखील ‘सोविश’ या नावाने अनेक फॅन पेज चालू केले आहेत. मात्र, अचानक त्यांच्यात असे काही झाले आहे की, जे पाहून सगळ्यांना खूप दुःख झाले आहे. एक प्रोमो समोर आला आहे. यामध्ये सोनाली विशाल आणि विकास बसलेले असतात. (Bigg Boss Marathi 3 : Vishal nikam get sad after sonali tell about her marriage)
यामध्ये विशाल सोनालीला म्हणतो की, “तू खोटं का बोलली माझ्याशी, कोणतरी होता आता तो कोणीच नाही माझ्यासाठी.” विशाल म्हणतो की, “नाव काय आहे त्याच?” यावर विकास “अक्षय,” असे सांगतो. नंतर विशाल म्हणतो की, “म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत तू माझ्याशी खोटं बोलली आहे.” यानंतर सोनाली तिथून निघून जाते.
ती निघून गेल्यावर विकास विशालला सांगतो की, “ती असं म्हणाली की, माझं लग्न ठरलंय.” यावर विशाल खूप दुःखी होतो आणि म्हणतो की, “याचा अर्थ ती माझ्या भावनांशी खेळत आहे.” यावर विकास “कंटेंट,” असे म्हणतो.
हा प्रोमो पाहून ‘सोविश’च्या चाहत्यांना खूप दुःख झाले आहे. त्यांच्या नात्याबाबत सगळ्यांना खूप उत्सुकता लागली होती. मात्र, सोनालीच्या या वागण्याने आता विशालवर काय परिणाम होईल? तसेच खेळामधील त्याचे लक्ष विचलित तर होणार नाही ना? असे अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-आपल्या डान्सने सगळ्यांना भुरळ घातलेल्या अमृता खानविलकरचा असा आहे सिनेसृष्टीतील प्रवास, वाचा
-यह चाँद सा रोशन चेहरा! श्रुती मराठेचा ग्लॅमरस लूक घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ
-जोडा असावा तर असा!, मानसी नाईकने पतीसोबत व्हिडिओ शेअर करून लिहिले भन्नाट कॅप्शन