‘बिग बॉस मराठी’च्या घरात दर वीकेंडला पाहुणे येत असतात. सदस्यांची लांबूनच भेट घेतात. तसेच, त्यांना काही मोलाच्या गोष्टी सांगतात. हा आठवडा दिवाळी स्पेशल साजरा झाला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या आठवड्याचे सगळेच टास्क झाले. या आठवड्यात ‘जीव माझा गुंतला’ फेम अंतरा आणि मल्हार घरातील सदस्यांना भेटायला येणार आहेत. ते दोघे घरातील सदस्यांना शुभेच्छा द्यायला येणारच आहेत, परंतु त्यासोबतच त्यांच्यासाठी खास गिफ्ट आणि सरप्राइज घेऊन येणार आहेत. घरात असले तरीही बिग बॉस कोणत्याही गोष्टीत कमतरता पडू देत नाहीत. सगळे सण आनंदाने साजरे व्हावेत, याची ते नेहमीच काळजी घेत असतात.
अंतरा आणि मल्हार म्हणजेच योगिता चव्हाण आणि सौरभ चौगुले हे घरात येणार आहेत. त्यांना पाहून घरातील सगळे खूप खुश होतात. यावेळी बिग बॉस त्या दोघांचे स्वागत करतात. त्यानंतर ते म्हणतात की, “आत्ताच दिवाळी भाऊबीज झाली आहे. त्यांच्या भावांनी बहिणींनी तुम्हाला छान छान गिफ्ट पाठवले आहेत.” यावेळी गिफ्ट पाहून सगळेच भावूक होतात आणि रडायला लागतात. यानंतर योगिता म्हणते की, “मीरा एक स्पेशल गिफ्ट येतंय तुझ्यासाठी.” यानंतर मीरा दाराजवळ रडत रडत पळत जाते. (Bigg Boss Marathi 3 : yogita Chavhan and Saurabh chaugule’s guest appearance on weekend)
तिला पाहून घरातील सगळेच सदस्य खूप भावुक होतात आणि रडू लागतात. तसेच विशाल म्हणतो की, “बिग बॉसच्या घरात आल्यापासून कोणालाही आतमध्ये येता येत नाही त्यामुळे घरातील कोणालाही मी पाहिले नाही पण सौरभ भावा तू इथे आलास हे बिग बॉसने मला दिलेलं खूप मोठं सरप्राइज आहे.”
त्यामुळे आता येणारा एपिसोड खूपच रंगतदार असणार आहे. तसेच या आठवड्यात कोण घराबाहेर जाईल से समजणार आहे. या आठवड्यात मीनल आणि विशाल सेफ झाले आहेत. परंतु आता जय, सोनाली आणि तृप्तीमधील एक स्पर्धक या घराचा निरोप घेणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘या’ दिवशी प्रदर्शित होणार बहूप्रतीक्षित ‘झिम्मा’, चलचित्र कंपनीने ट्वीट करून दिली माहिती
-‘बिग बॉस मराठी’च्या घरातून ‘या’ स्पर्धकांची होणार एक्झिट?, प्रेक्षकांनी दिला कौल