लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस‘ मराठीचा सध्या 4 पर्व सुरु असून प्रेक्षकांनी कार्यक्रम डोक्यावर घेतलं आहे. त्याशिवाय चौथ्या पर्वातील चर्चेत असणाऱ्या अनेक चेहऱ्यांपैकी आरोह वेलनकर याचा प्रवास संपला आहे. प्रसाद जावेद नंतर आरोह बिगबॉसच्या घरातून बाहेर पडला आहे. बाहेर आल्यानंतर त्याने माध्यमांशी संवाद साधत असताना बिग बॉसवर गंभीर आरोप केले आहेत.
मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध अभिनेता आरोह वेलणकर (Aroh Welankar) याने अनेक मालिकांमध्ये काम केले असून प्रेक्षकांच्या मनात वेगळेच स्थान निर्माण केले आहे. यंदा तो बिगबॉसमधील 4 पर्वामध्ये पाहायला मिळाला. मात्र, नुकतंच अभिनेत्याचा प्रवास संपला आहे. त्याने नुकतंच सोशल माध्यमांशी संवाद साधत असताना बिग बॉसवर राखी सावंत (Rakhi Sawant) विषयी गंभीर आरोप केले आहेत.
आरोहने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान ड्राम क्वीन राखी सावंत हिच्याबद्दल प्रश्न विचाण्यात आला होता, कारण तो घरामध्ये तिच्या वागणूकीमुळे खूपच त्रस्त दिसायचा. त्याशिवाय दोघांमध्ये सतत वादही होताना पाहायला मिळाले. राखीच्या वागणुकीबद्दल सांगत असताना आरोहने सांगितले की, “राखी एक वेगळीच व्यक्ती आहे. ती कशी आहे, यावर मी भाष्य करु शकत नाही मात्र, ती ज्या काही गोष्टी करते त्यामुळे प्रचंड टीआरपी मिळतो. पण, तिच्यासोबत घरामध्ये राहाणे फारच कठीण आहे.”
View this post on Instagram
आरोहने पुढे सांगितले की, “प्रत्येक व्यक्ती वेगळ्या परिस्थितीमध्ये लाहानाचे मोठे होतात. प्रत्येकाच्या सवयी वेगळ्या असतात. राखीसारख्या व्यक्तीला मी यापूर्वी कधीच भेटलो नाही. बिग बॉसच्या 2 ऱ्या पर्वामध्ये अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) होते, पण ते मुद्दाम काही करायचे नाही. मात्र, राखी सगळं ठरवून करते.”
बुधवार (दि, 4 जानेवारी) रोजी घरातून दोन सदस्य म्हणजेच आरोह वेलनकर आणि प्रसाद जावेद हे दोन सदस्य बाहेर पडले आहेत. आता घरामध्ये टॉप 5 सदस्य उरले आहेत. येत्या 8 जानेवारीला बिग बॉस चौथ्या परवाचा अंतिम सोहळा पार पडणार असून चोथ्या पर्वचा शिलेदार मिळणार आहे. त्यामुळे शेवटच्या आठवडा कोण बाजी मारेल हे पाहाणे खूपच महत्वाचे ठरणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
विरुष्काच्या अध्यात्मिक ट्रीपमध्ये दिसला क्युट वामिकाचा खट्याळ अंदाज, व्हिडिओ झाला व्हायरल
‘किसिंग सीन केल्यामुळे रक्त वाहूस्तर मारलं…’, इमरान हाश्मीने शेअर केला पत्नी सोबतचा धक्कादायक किस्सा