Wednesday, January 28, 2026
Home मराठी वर्षा ताईंमुळे संपणार अरबाझ आणि निक्की यांच्यातला दुरावा…

वर्षा ताईंमुळे संपणार अरबाझ आणि निक्की यांच्यातला दुरावा…

बिग बॉस मराठीला आता ४ आठवडे पूर्ण होत आहेत. एवढ्या दिवसांत सदस्यांना बिग बॉसचा हा खेळ आता बऱ्यापैकी कळला आहे. घरात अनेक गोष्टी आता बदलत आहेत त्यामुळे या खेळला आता खरी रंगत आली आहे. आता घरातला नवीन ट्वीस्ट म्हणजे अभिजित सावंत याच्यामुळे निक्की तांबोळी आणि अरबाझ पटेल तांच्यात दुरावा निर्माण होणार आहे. 

असही अनेक दिवसांपासून निक्की आणि अरबाझ यांच्यात खटके उडताना दिसत आहेत. त्यांच्यात एक दुरावा आला असून त्यामुळेच वर्षा उसगावकर त्या दोघांची समजूत घालताना दिसणार आहेत. आता वर्षा यांच्यामुळे अरबाझ आणि निक्की यांच्यातील दुरावा कमी होणार आहे.

एका नवीन प्रोमो मध्ये वर्षा ताई म्हणत आहेत, मी मोठी आहे असं म्हणता मग इथे तरी माझं ऐका, पुढे मग निक्की म्हणते मी अरबाझला विचारलं, तुला बरं वाटतंय का आता त्यावर अरबाझ म्हणतो ठीके. वर्षा ताई म्हणतात त्याला खूप छान वाटतंय… त्याची गळाभेट घे. निक्की आणि अरबाज यांच्यातला दुरावा मिटल्याने घरातील इतर सदस्य सुद्ध आनंदित होतात. 

दरम्यान बिग बॉसच्या घरात आज निक्कीचा वाढदिवस होणार आहे. तिच्या वाढदिवसानिमित डीपी दादांनी खास गाऱ्हाणं घातलेलं बघायला मिळणार आहे. निक्कीला बर्थडे विश करत डीपी दादा म्हणतात, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, ७५ वर्षे जग… तुझं तारुण्य असंच टिकू देत. लोकांना छळू नकोस, त्यांना त्रास देऊ नकोस, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. 

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

पश्चिम बंगालच्या राजकीय परिस्थितीवर बोलले विवेक अग्निहोत्री; लैंगिक हिंसाचारामुळे समाज आणि कुटुंबांचे मनोधैर्य खच्ची होते …

 

हे देखील वाचा