Thursday, June 12, 2025
Home अन्य ‘बिग बॉस’ फेम मीरा जगन्नाथच्या नवीन कारचा भीषण अपघात, घडला प्रकार जाणून घ्याच

‘बिग बॉस’ फेम मीरा जगन्नाथच्या नवीन कारचा भीषण अपघात, घडला प्रकार जाणून घ्याच

बिग बॉस पर्व 3 मधील सहभागी झालेली अभिनेत्री मीरा जगन्नाथ हिने चांगल्या खेळीने स्वत:चं स्थान निर्माण केलं ज्यामुळे मीराला अमाप प्रसिद्धी मिळाली. मात्र, अभिनेत्रीविषयी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे की, मीराच्या नवीन कारचा भीषण अपघात झाला आहे ज्यामध्ये त्यांच्या गाडीचं प्रचंड नुकसान झालं आहे. 

अभिनेत्री मीरा जगन्नाथ (Mira Jagannath) हिला बिग बॉसनंतर अमाप प्रसिद्धी मिळाली ज्यांनतर तिने काही कोळी गितांमध्ये काम केले होते. मीरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर केली होती ज्यामध्ये तिने अपघाताच्या प्रकरणाबद्दल सांगितले होते. यावेळी तिने गाडीचे काही फोटो देखिल शेअर केले होते.

मीराने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले होते की, “माझा काही दिवसांपूर्वी अपघात झाला. देवाचे आभार. मित्रमंडळी, नातेवाईक आणि फॅन्सच्या प्रेमामुळे मी अगदी सुखरूप आहे. तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या.” मिराच्या गाडीला मागून कोणीतरी धडक मारल्याचे दिसत आहे पण अपघात कोणत्या मार्गावर झाला आहे. हे अद्याप समजले नाही.  या अपघातामध्ये मीराच्या नवीन गाडीचं प्रचंड नुकसान झालं आहे.

 

View this post on Instagram

 

मीराने अगदी दोन महिन्यापूर्वीच म्हणजेच डिसेंबर महिन्यातच नवीन कार खरेदी केली होती. तिने दत्तजयंतीचा मुहर्त साधून  औचित्य साधून होतं कार खरेदी केली होती. मात्र, काही दिवसांतच अभिनेत्रीची कार निकामी झाली. बीग बॉस नंतर अभिनेत्री मराठी वाहिनीवरील’ ठरलं मग’ या मालिकेत काम करत आहे. त्याशिवाया तिने साकारलेलं साक्षीचं पात्र देखिल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
नसीरुद्दीन शाह यांनी त्याच्या ‘या’ सिनेमात अक्षय कुमारकडून करून घेतली होती नाकघासणी
birthday| एली मॅगझीनमध्ये छापली जाणारी पहिली अभिनेत्री उदिता गोस्वामी, आज आहे बॉलिवूडपासून लांब

हे देखील वाचा