अभिनेत्री सई लोकूर सोशल मीडियावर खूप सक्रिय राहते. सतत आपले फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून, ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. ट्रॅडिशनल लूक असो वा वेस्टर्न असो, ती प्रत्येक लूकमध्ये तितकीच सुंदर दिसते. तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक नजर टाकल्यास आपल्या सहज लक्षात येईल की, सई प्रत्येक आऊटफिट किती उत्तमरीत्या कॅरी करते. आता मात्र अभिनेत्रीचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे.
सई लोकूरने तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून एक शॉर्ट व्हिडिओ पोस्ट केला आहे, जो सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री तिच्या पतीसोबत नाचताना दिसत आहे. ‘माय बेस्टी’ या गाण्यावर दोघांच्या स्टेप्स अगदी पाहण्यासारख्या आहेत. त्यांची केमिस्ट्रीही पाहायला मिळत आहे. आपण पाहू शकतो की, यात सईने काळ्या पांढऱ्या रंगाचा वन पीस परिधान केला. तर, तिच्या पतीने काळ्या रंगाचा टी शर्ट व काळीच पँट घातली आहे.
हा डान्स व्हिडिओ शेअर करत सईने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “डान्स बेबी डान्स, तीर्थदीप इतका क्यूट का आहेस?” हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. याच लूकमध्ये या जोडप्याने काही फोटोही पोस्ट केले आहेत, ज्यांना देखील चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. याशिवाय हे जोडपे सतत त्यांचे रोमँटिक फोटो व व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असतात, जे दरदिवशी व्हायरल होतात.
सई गेल्या वर्षी ३० नोव्हेंबरला, तीर्थदीप रॉयसोबत लग्नबंधात अडकली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटोही त्यावेळी बरेच व्हायरल झाले होते. अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला होता. विशेष म्हणजे, हे लग्न महाराष्ट्रीयन आणि बंगाली या दोन्ही पद्धतीने पार पडले होते.
सईने आतापर्यंत ‘नो एंट्री पुढे धोका आहे’, ‘किस किसको प्यार करू’, ‘जरब’, ‘कुछ तुम कहो कुछ हम कहे’ यांसारख्या हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…










