मराठी बिग बॉस फेम अभिनेत्री सई लोकूर नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. बिग बॉस संपल्यानंतर सई कोणत्याच मालिका अथवा चित्रपटात दिसली नव्हती. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून सई नेहमीच प्रेक्षकांना भेटत होती.
ऑक्टोबरमध्येच सई आणि तीर्थदीप या दोघांचा साखरपुडा झाल्यानंतर सईच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू झाली होती. अखेर दिनांक ३० नोव्हेंबरला सईचा विवाहसोहळा कुटुंबीय आणि निकटवर्तीयांच्या उपस्थितीत बेळगाव येथे संपन्न झाला. तीर्थदीप रॉय असे सईच्या जोडीदाराचे संपूर्ण नाव असून सई आणि तीर्थदीपची ओळख एका मॅट्रिमोनिअल वेबसाइटवरुन झाली.
सईचे लग्न जरी ३० नोव्हेंबरला होते. तरी लग्नाआधीच्या सर्व विधींना अगोदरच सुरुवात झाली होती. त्यामुळे मेहेंदी, हळद, देवकार्य अशा अनेक विधींचे सर्व फोटो सई तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर टाकत होती. तिचे फॅन्स देखील सर्व फोटोंना लाईक अथवा कमेंट करून तिला शुभेच्छा देत होते.
सई आणि तीर्थदीप यांचा लग्न सोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडला. या दोघांनी मराठी आणि बंगाली या दोन्ही पद्धतीने लग्न केले. सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नच फोटो पाहून कलाकार आणि फॅन्सने त्यांच्यावर लाईक्सचा वर्षाव केला असून त्याच्या नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सई, तीर्थदीपने महाराष्ट्रीयन लग्नासाठी पारंपरिक पेशवाई पोशाख परिधान केला होता. सईने गुलाबी, हिरव्या रंगाची नऊवारी तर तीर्थदीपणे पांढरा कुर्ता, गुलाबी धोती आणि त्यावर पेशवाई पगडी. असा अतिशय सुंदर पोशाख केला होता. या रूपात नवदाम्पत्य अतिशय सुरेख दिसत होते. बंगाली पद्धतीच्या लग्नासाठी सईने पारंपरिक पांढरी, मरून रंगाची साडी आणि तीर्थदीपने मरून रंगाचा कुर्ता घातला होता.
सईच्या लग्नातील धमाल मस्तीचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट करताच ते मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले असून सर्वजण सईला नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहे.
सईने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले असले तरी तिला खरी ओळख ‘मराठी बिग बॉस’ पर्व पहिले यातून मिळाली. सोबतच सईने कपिल शर्माची मुख्य भूमिका असलेल्या ‘किस किस को प्यार करू’ या चित्रपटात कपिलच्या बायकोची भूमिका साकारली होती. दैनिक बोंबाबोंकडूनही सई आणि तीर्थदीप यांना नवीन वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.