बिग बॉस फेम मराठी गायक अभिजित सावंत हा दिवसेंदिवस प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध होताना दिसतोय, इंडियन आयडॉल च्या माध्यमातून वर आलेल्या अभिजीतचा खेळ बिग बॉसच्या प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. आता अभिजीतची पत्नी देखील खुलेपणाने त्याचे कौतुक करताना दिसत आहे. सोशल मिडीयावर एक पोस्ट शेयर करताना तिने अभिजीतचं तोंडभरून कौतुक केलं आहे. पण याच सोबत तिने यावेळी घरातील टीम बी ला देखील चांगलेच सुनावले आहे.
बिग बॉस मराठीच्या घरात अगदी सुरुवातीपासूनच सदस्यांमध्ये भांडणे होताना दिसत आहेत. वेगवेगळ्या कारणांमुळे हा कार्यक्रम चर्चेत असतोच. या सिझन मध्ये घरात सदस्यांमध्ये दोन गट पडले आहेत. मागच्याच आठवड्यात या दोन्ही गटांमध्ये फूट पडलेली सुद्धा बघायला मिळाली.
अभिजितची पत्नी शिल्पा हिने तिच्या इन्स्टा अकाउंटवर एक स्टोरी शेयर केली आणि लिहिले की, तुला नाही तर ग्रुपला तुझी गरज आहे My Strongest Man !
बिग बॉसच्या घरातील या दोन गटांपैकी टीम ए मध्ये निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, अरबाझ पटेल, वैभव चव्हाण, घनश्याम दरोडे हे सदस्य आहेत तर टीम बी मध्ये वर्षा उसगावकर, अभिजित सावंत, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, सुरज चव्हाण, आर्या जाधव हे सदस्य आहेत पैकी अभिजित सावंत देखील त्यांच्यापैकी आहे.
सध्या बिग बॉस मध्ये या आठवड्यात सर्व सदस्यांना जोड्यांमध्ये फिरायला सांगितले आहे. कुणीही एकटे फिरू नये अशी सक्त ताकीद दिली आहे. काही जोड्या या थेट बिग बॉस ने ठरवून दिल्या आहेत. यामुळे अभिजित आणि निक्की यांची चांगलीच गट्टी जमल्याचं बघायला मिळतंय. अभिजीतची वागणूक संगतीमुळे बदलली आहे असं सगळेजण म्हणत आहेत. पण आता अभिजीतच्या पत्नीने सगळ्यांना जोरदार उत्तर दिलंय.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
कार्तिकने भाड्याने दिली त्याची जुहू येथील प्रॉपर्टी; प्रती महिना होणार इतक्या लाखांची कमाई…