Thursday, November 21, 2024
Home मराठी बिगबाॅस मराठी सिझन ५च्या स्पर्धकांना मिळाले इतके मानधन; सर्वात कमी पैसे घेणारा सुरज ठरला महाविजेता…

बिगबाॅस मराठी सिझन ५च्या स्पर्धकांना मिळाले इतके मानधन; सर्वात कमी पैसे घेणारा सुरज ठरला महाविजेता…

नुकताच बीग बॉसचा पाचवा सिझन पार पडला. गुलीगत सुरज चव्हाणने सर्वांना पछाडत विजेतेपद मिळवले. पण सुरज चव्हाण याला आणि घरातील इतर सदस्यांना किती रुपये मानधन मिळाले हे माहिती आहे का तुम्हाला. सुरज आणि इतर सर्व सहभागी सदस्यांना प्रत्येकी आठवड्याला पैसे मिळत होते. बघुयात कोणत्या सदस्याला किती मानधन मिळाले… 

कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर आणि छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांना बिगबाॅसमध्ये प्रत्येक आठवड्याला ५० हजार रुपये मिळत होते. त्यानंतर डीपीदादा म्हणजे धनंजय पोवार ६० हजार रुपये फी घेत होते. वैभव चव्हाण दर आठवड्याला ७० हजार रुपये घेत होता. तर पुरुषोत्तम दादा पाटील यांना एका आठवड्यासाठी १ लाख ३५ हजार रुपये मिळत होते. निखिल दामले बिगबाॅसच्या घरात प्रत्येक आठवड्याला सव्वा लाख रुपये कमावत होते. पॅडी कांबळे आठवड्याचे दोन लाख रुपये घेत होते, तर वर्षा उसगावकर यांना अडीच लाख रुपये मानधन मिळत होते. 

अभिजीत सावंत आठवड्याला साडेतीन लाख रुपये फी घेत होता. तो यंदाच्या सिझनचा दुसरा सर्वात महागडा स्पर्धक होता. तर यंदाची सर्वात महागडी स्पर्धक ही निक्की तांबोळी असून, तिला दर आठवड्याला ३ लाख ७५ हजार रुपये फी मिळत होते. महाराष्ट्राचा लाडका आणि यंदाच्या बिगबाॅस सिझन 5 चा विजेता सुरज चव्हाण आठवड्याचे फक्त २५ हजार रुपये मानधन स्विकारून बिगबाॅसच्या घरात आला होता. मात्र घरातून बाहेर पडताना चाहत्यांचं भरपूर प्रेम, बिगबाॅस सिझन ५ची ट्रॉफी, 14.6 लाखांचा चेक, 10 लाख रुपयांचं ज्वेलरी व्हाउचर आणि एक इलेक्ट्रीक टू-व्हीलर हे सर्व घेऊन तो बाहेर पडला आहे. 

सर्वांच्या मागून येत सुरजने हे यश संपादन केले आहे. यावर सोशल मिडीयावर अनेक लोक सुरजचे भरभरून कौतुक करत आहेत. मात्र काही जणांनी यावर टीका सुद्धा केली आहे. केदार शिंदे यांनी सुरजला घेऊन एक सिनेमा काढायची घोषणा सुद्धा केली आहे. 

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

या चित्रपटानंतर रेणुका शहाणे यांना येऊ लागल्या होत्या वहिनीच्या भूमिकेच्याच ऑफर्स; आजही टिकून आहे ती सोज्वळ प्रतिमा…

 

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा