बीग बॉस मराठीचे आजपर्यंत 5 सीझन्स झाले आहेत. त्यातील प्रत्येक विजेत्याला किती रुपये मिळाले? बीग बॉसचा पहिला सीझन 2018 साली झाला होता. पहिल्या सीझनची विजेती मेघा धाडे ठरली होती. बिग बॉसच्या ट्रॉफीसह तीला 18 लाख 60 हजार रुपये मिळाले होते. तसेच निर्वाळा रियालिटी सिटी ऑफ म्युझिकडून घर देखील मिळाले होते.
दुसऱ्या बीग बॉसचा विजेता शिव ठाकरे ठरला होता. त्याला 25 लाख रुपये मिळाले होते. परंतू सर्व काटछाट होऊन हातात 17 लाख आल्याचे त्याने सांगितले होते. तिसऱ्या सीझनचा विनर विशाल निकमला 20 लाख रुपये व ट्रॉफी मिळाली होती, तर चौथ्या पर्वाचा विजेता असलेल्या अक्षय केळकरला 15 लाख 50 हजार रुपये, सोन्याचे ब्रेसलेट आणि 5 लाखांचा चेक मिळाला होता.
पाचव्या सीझनचा विनर ठरलेल्या सुरज चव्हाणला बिगबाॅस सिझन ५ची ट्रॉफी, 14.6 लाखांचा चेक, 10 लाख रुपयांचं ज्वेलरी व्हाउचर आणि एक इलेक्ट्रीक टू-व्हीलर मिळाली आहे.
याउलट हिंदी बिग बॉस मध्ये विजेत्यांना दुप्पट रक्कम दिली जाते. एमसी स्टॅन जेव्हा बीग बॉस हिंदी जिंकला होता तेव्हा त्याला 31 लाख 80 हजार रुपये मिळाले होते. भारतात जवळपास ७ वेगवेगळ्या भाषांमध्ये बिग बॉस खेळवले जाते. हा कार्याक्रम देशभरात खूप लोकप्रिय आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
बॉलीवूड मधील या आहेत प्रसिद्ध बहिणी; काही झाल्या हिट काही फ्लॉप