बिग बॉस हा शो मराठीत असो किंवा हिंदीमध्ये विवादीतच सिद्ध होतो. अनोळखी लोकांना काही महिने एका अशा घरात राहावे लागते, ज्या घराचा बाहेरच्या जगाशी काहीही संपर्क नसतो. वेगवेगळे खेळ ठेऊन घरातील लोकांना त्या खेळातूनच मनोरंजन करून घ्यावे लागते. या खेळादरम्यान अनेकदा स्पर्धकांमध्ये तुफान भांडणं आणि राडे होतात. वेगवगेळ्या विचारांच्या बऱ्याच व्यक्ती एका छताखाली राहिल्या तर नक्कीच मतभेद होणार आणि त्यातून वादांची निर्मिती होऊन त्यांच्यात फूट पडणार. या घराचे अजून एक वैशिट्य म्हणजे एकमेकांबद्दल त्या व्यक्तीच्या मागे बोलणे.
जसे हा खेळ सुरू होतो तसे घरात मित्र आणि त्यातून ग्रुप तयार होतात. सध्या बिग बॉस मराठीमध्ये बिग बॉसनेच काही खेळ हे ग्रुपमध्ये खेळवले आहे, किंबहुना गृपमध्येच खेळ होत आहे, नुकताच बिग बॉसमध्ये ‘माझे मडके भरी’ हा टास्क रंगला होता. बिग बॉसने सांगितलेल्या याच टास्क संदर्भात विकास त्याच मत मांडत आहे.
विकास उत्कर्षबद्दल बोलत असून, तो मीनल, आविष्कार, विशाल आणि सोनालीला सांगतो की, “मी आज दिवसभर उत्कर्षचे निरीक्षण केले, मला त्याबद्दल सांगायचे आहे. पहिला टास्क जेव्हा झाला तेव्हा त्याचे असे होते, की मी त्यांची मडकी फोडणार. आता मला असे वाटत आहे की, तो कोणत्याही गोष्टीला क्रिएटिव्हली करण्यापेक्षा त्याचा संपूर्णपणे नाश कसा होईल यावर भर देत आहे. त्याने याचा विचारच नाही केला की आपल्याला आपली मडकी कशी वाचवता येतील. त्याला फक्त समोरच्यांची मडकी फोडायची एवढेच समजत होते.
पुढे विकास म्हणतो, “तो फक्त बडबड करतो मी असे करेल, तसे करेल. तो म्हणाला होता की, मला तर महेश सर सुद्धा बोलले की मी हुशार आहे उगाचच नाही बोलले ते. बघ आता मी काय करतो, असे तो तृप्ती ताईंना सांगत होता. खरं सांगायचं झालं तर ते म्हणतात ना ‘बोलबच्चन’ हो खरंच उत्कर्ष हा बोलबच्चन आहे आणि त्याची मानसिक आणि शारिरीक क्षमता काहीच नाहीये,”
आता सुरू असलेल्या या टास्कमध्ये कोणता ग्रुप जिंकणार हे लवकरच समजेल.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-शर्लिन चोप्राचा शाहरुख खानवर गंभीर आरोप; म्हणाली, ‘त्याच्या पार्टीत लोक पांढऱ्या पावडरचे सेवन…’