बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व चांगलेच चर्चेत आहे. संपूर्ण महाराष्ट्र या पर्वाची चर्चा चालू आहे. घरातील स्पर्धकांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. घरत होणारे टास्क, भांडण, राडे, गमतीजमती प्रेक्षकांना देखील मोठ्या प्रमाणात आवडत आहेत. गेला आठवडा स्पर्धकांनी खूप राडे घातले आहेत. त्यामुळे सर्वत्र त्यांची चर्चा चालू आहे. अशातच घरात वीकेंडचा डाव झाला. यावेळी मांजरेकरांनी ज्या स्पर्धकांनी चांगले काम केले त्यांचे कौतुक केले परंतू जे स्पर्धक चुकिचे खेळले त्यांची कानउघडणी केली. तसेच मीनलचे त्यांनी खूप कौतुक केले.
या आठवड्यात मांजरेकर खूपच रागावले होते. आठवड्याभरात घरातील सदस्यांनी जे काही कृत्य केले त्याबाबत त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी चावडी देखील बंद केली आहे. म्हणाले की, “मला तुमच्याशी बोलायची अजिबात इच्छा नाहीये. या सिझनने लाज आणली आहे. तुम्हाला काय वाटत तुम्ही जे काही करता ते बाहेर तुमच्या प्रेक्षकांना आवडत आहे का?” यावेळी त्यांनी अनेकांची कान उघडणी केली. (bigg boss marthi 1 contestent megha dhade and resham tipnis enter in bigg boss marthi 3 as a guest)
यानंतर वीकेंडला घरत दोन खास पाहुण्यांचे आगमन होते. ते म्हणजे बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातील स्पर्धक रेशमी टिपणीस आणि बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे यांनी घरात एन्ट्री केली. त्यांना बघून घरातील सगळ्यांना खूप आनंद झाला. परंतु त्या दोघी स्पर्धकांना प्रत्येक्षात भेटू शकल्या नाही. यावेळी त्यांनी घरातील स्पर्धकांचे कौतुक केले. त्यांनी खास करून मीनल, विकास, विशाल यांचे कौतुक केले आणि त्यांना सांगितले की, बाहेर सगळ्यांना ते खूप आवडत आहेत.
यासोबत त्यांनी घरात एक गेम देखील घेतला. काही म्हणी लिहिलेल्या पाट्या घरत ठेवलेल्या होत्या. त्या पाटीवर लिहिलेली म्हण घरातील कोणत्या स्पर्धकाला जुळते हे पाहून त्यांना ती पाटी दिली. तसेच त्यांनी घरातील सगळ्यांशी संवाद साधला. त्यांच्या येण्याने घरातील वातावरण अगदी हलके-फुलके आणि आनंदमय झाले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-पहिली करवाचौथ साजरी करणाऱ्या मानसी नाईकचे फोटो पाहून ‘या’ अभिनेत्रीने केले तिच्या लूकचे कौतुक
-‘नवऱ्याचं रात्री चंद्राबरोबर दर्शन होईल’, म्हणणारी सोनाली करवाचौथसाठी पोहचली दुबईत