Saturday, July 6, 2024

Bigg Boss OTT Elimination: अक्षरा सिंग अन् मिलिंद गाबाला करण जोहरने दाखवला सरळ बाहेरचा रस्ता

करण जोहर सूत्रसंचालित ‘बिग बॉस ओटीटी १४’मध्ये रविवारी चांगलाच हंगामा झाला. काही पाहुण्यांनी ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला, तर काहींना सरळ बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. दररोज ‘बिग बॉस’मधील स्पर्धक काही ना काही नवीन टास्क खेळत असतात. यामध्ये होणारी भांडणे, वाद या सर्वांवर करण जोहरचे बारीक लक्ष असते. करण यामध्ये ‘संडे का वार’मधून सगळ्या स्पर्धकांवर चांगलाच बरसतो. यामुळे रविवारी काही स्पर्धकांना करणने बिग बॉसच्या घरातून काढून टाकले.

‘संडे का वार’मधून अक्षरा सिंग आणि मिलिंद गाबाच्या वर्तवणुकीला केराची टोपली दाखवत बाहेर काढले. खरं तर रविवारची सुरुवात खुप शांत, सुखद आणि आनंददायी झाली. निशांत, मूस, प्रतीक आणि नेहाच्या प्रेमळ वर्तवणुकीमुळे रविवारची सकाळ प्रसन्न झाली होती. त्यानंतर करणमुळे हळूहळू बिग बॉसच्या घरातील वातावरण तणावपूर्ण होऊ लागले. यामुळे सकाळची शांतता ही वादळा पूर्वीची शांतता होती असे म्हणायला हरकत नाही. (Bigg Boss OT shocking elimination actress Akshara Singh and singer Milind Gaba evicted from the Bigg Boss ott)

‘बिग बॉस’मधील स्पर्धकांना रविवारी प्रेक्षकांकडून काही प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये प्रेक्षकांनी आणि करणने अक्षराला चांगलेच धारेवर धरले. खरं तर हे सर्व नेहा भसीनमुळे सुरु झाले. नेहा ‘बिग बॉस’च्या घरात लहान लहान कपडे घालून फिरत होती. त्यामुळे अक्षराने तिच्यावर अश्लील शब्दात टीका केली होती. त्यामुळे प्रेक्षकांच्या आणि करणच्या ती चांगलीच नजरेत आली. यावर प्रेक्षकांनी तिला चांगलेच ट्रोल केले होते. तसेच करणने देखील तिची चांगलीच कानउघडणी केली. अक्षराची बेस्ट फ्रेंड दिव्या अग्रवाल देखील म्हणाली की, “त्या वेळी अक्षराचे वागणे अजिबात बरोबर नव्हते.” यावर अक्षराने सर्वांची माफी देखील मागितली.

पुढे नेहाला तिच्या छोट्या कपड्यांवरून विचारण्यात आले. तेव्हा नेहा म्हणाली की, “निया शर्माने देखील माझ्यावर टीका केली. मी मुलांना माझ्या जाळ्यात ओढत आहे असे निया मला म्हणाली. परंतु तसे काहीच नाही आहे.”

तसेच रविवारी ‘बिग बॉस’च्या घरामध्ये नवीन पाहुणे देखील दाखल झाले. यामध्ये निक्की तंबोली आणि रुबीनाने बिग बॉसच्या घरात चांगलीच आग लावली. त्यांच्या येण्यामुळे तणावपूर्ण वातावरणाला शांतता मिळाली. तसेच सर्व आनंदी झाले. एवढेच नाही, तर बिग बॉसच्या घरामध्ये रोनित रॉय आणि ऋचा चड्ढाने देखील हजेरी लावून खूप मज्जा केली. हे दोघे त्यांची नवीन वेबसिरीज ‘कॅंडी’च्या प्रमोशनसाठी इथे आले होते. तसेच शेवटी करण जोहरने मिलिंद गाबा आणि अक्षरा सिंग या दोघांना घराबाहेर काढले. रविवारी (५ सप्टेंबर) या दोघांचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अक्षय कुमारसोबत केले होते पदार्पण; मात्र सुंदरतेने वेड लावलेली शांतीप्रिया आज का राहतेय बॉलिवूडपासून दूर?

-सिद्धार्थ शुक्लाच्या कुटूंबाकडून जारी करण्यात आले निवेदन; मुंबई पोलिसांचे आभार मानत, लोकांना केली ‘ही’ विनंती

-हर्षवर्धन राणेनंतर ‘या’ प्रसिद्ध खेळाडूसोबत नात्यात आहे किम शर्मा; स्वत: केला खुलासा

हे देखील वाचा