Wednesday, July 3, 2024

‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात ‘हा’ स्पर्धक आहे कळीचा नारद मुनी! अक्षरा अन् नेहामध्ये लावली त्यानी भांडणं

सध्या ‘बिग बॉस ओटीटी’ छोट्या पडद्यावरील सर्वात गाजलेला शो आहे. त्यामागचे कारणही तसेच आहे. हा शो वादग्रस्त रियॅलिटी शो म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर आता या शोने त्यांच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. टीव्हीवर सेन्सर करण्यात येणारे सीन्सही निर्मात्यांनी दाखवायला सुरुवात केली आहे. यावेळी या शोमध्ये अनेक स्पर्धकांमधील जवळीक दिसून आली. त्यामध्ये राकेश बापट आणि शमिता शेट्टी यांचा समावेश आहे. याच्या व्यतिरिक्त काही स्पर्धकांमधील वाद हा शिगेला पोहोचला आहे.

नेहा-अक्षरामध्ये भांडण
प्रेम असो किंवा मैत्री, एकमेकांमधील वाद असो किंवा एखाद्याच्या बोलण्याने दुखावणे असो, या सर्व गोष्टी ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये भरभरून पाहायला मिळत आहेत. अक्षरा सिंग – प्रतीक सहजपाल आणि नेहा भसीन – मिलिंद गाबाचे कनेक्शन गेल्या आठवड्यात तोडण्यात आले. प्रतीकने नेहा भसीन आणि अक्षरा सिंगने मिलिंदशी कनेक्शन जोडले. त्यानंतर घरात जोरदार वाद आणि भांडणे झाली. (bigg boss ott akshara singh neha bhasin get into ugly fight due to pratik)

वादाचे निमित्त होता प्रतीक
वादाची सुरुवात ‘क्लॉक टास्क’ नावाच्या टास्कने झाली. जे हा टास्क करत नव्हते, त्यांना बाकीच्या लोकांचे लक्ष विचलित करायचे होते. अक्षरा सिंग आणि मिलिंद गाबा हे टास्क करण्यासाठी येताच, प्रतीक नेहाला अक्षराने त्याच्याशी केलेल्या संभाषणाबद्दल बोलतो.

अक्षराने खडसावले
यानंतर, अक्षरा निशांत भट्ट आणि मूस जट्टाना यांच्याशी बोलते आणि प्रतीक त्यांच्याकडून या प्रकरणाचा खुलासा घेण्याचा प्रयत्न करतो. अक्षरा सिंगने उत्तर देते की, ती कोणालाही स्पष्टीकरण देणार नाही. ती कोणालाही उत्तर देण्याच्या मनस्थितीत नाही. नेहा या प्रकरणामध्ये उडी मारते आणि अक्षराकडे इशारा करते.

अक्षराने नेहावर काढला राग
यामुळे अक्षरा सिंग संतापते आणि नेहाला ओरडते आणि की तिचे मन योग्य फ्रेममध्ये नाही. नेहा अक्षराला म्हणाली की, “इथे ये.” त्यावर अक्षरा म्हणाली की, “तू असशील तुझ्या घरी. येथे येण्यासाठी मी स्वतःसाठी नाव कमावले आहे आणि या घरात प्रवेश केला आहे. मला तुझ्याकडे बोलावण्यात काय अर्थ आहे?” यानंतर नेहा आणि अक्षरा यांच्यातील भांडण वाढते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यनंतर एजाज खानने मागितली माफी; म्हणाला, ‘जर मी तुझ्याशी…’

-सिद्धार्थ शुक्ला मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांनी नोंदवला एडीआर, डॉक्टरांनी ‘या’ मृत्यूची वर्तवली शक्यता

-कधी ओपन शर्ट, तर कधी जंगलात बिकीनी घालून पोझ देतेय अदाकारा; वेड लावतोय मौनीचा हा कातीलाना अंदाज

हे देखील वाचा