Tuesday, April 8, 2025
Home अन्य Bigg Boss OTT: दिव्या अग्रवालने रागाच्या भरात बादली घेऊन केला रिद्धिमावर हल्ला, तर तिने…

Bigg Boss OTT: दिव्या अग्रवालने रागाच्या भरात बादली घेऊन केला रिद्धिमावर हल्ला, तर तिने…

‘बिग बॉस ओटीटी’ या शोकडून प्रेक्षकांनी जशी अपेक्षा ठेवली होती, तो अगदी तसाच आहे. दर्शक हा शो २४ तासांसाठी वूट सिलेक्ट वर लाइव्ह पाहू शकतात. त्याचबरोबर या शोमध्ये मैत्रीचे आणि शत्रुत्वाचे असे अनेक रंग पाहायला मिळत आहेत. शोच्या स्पर्धकांमध्ये मारामारी आणि वादविवाद पाहायला मिळत आहेत. तर काही स्पर्धक आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत.

दिव्या अग्रवाल ही अशीच एक स्पर्धक आहे. जी यापूर्वी प्रतीक सहजपालसोबतच्या भांडणामुळे सर्वांच्या नजरेत आली होती. आता ती रिद्धिमा पंडित आणि अक्षरा सिंग यांच्यासोबत नुकत्याच झालेल्या वादामुळे चर्चेत आली आहे.

आज (१३ ऑगस्ट) ओटीटी प्लॅटफॉर्म वूटने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिव्या अक्षरा सिंग आणि रिद्धिमा पंडित यांच्यासोबत एका टास्क दरम्यान वाद घालताना दिसून आली आहे. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये दिव्या खूपच चिडलेली दिसत आहे. ती एका मोठ्या तलावात पूलमधून बादलीत पाणी आणते आणि ते रिद्धिमावर ओतते. रिद्धिमा बादली पकडते आणि तिच्या शेजारी उभ्या असलेल्या अक्षरा सिंगवर पाणी पडते.

हे सर्व घडून ही रिद्धिमा दिव्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. तर दुसरीकडे अक्षरा सिंग चिडते आणि दिव्याला एक असभ्य मुलगी म्हणते. यावर दिव्या काही तरी बोलते. मग अक्षरा त्यांना आठवण करून देते की, हे एक कार्य आहे.

हा व्हिडिओ पाहून मोठ्या प्रमाणावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर एक युजर म्हणाला की, ‘दिव्या ओव्हरऍक्टिंगचे दुकान आहे.’ तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, ‘दिव्या प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करत आहे.’ तर बरेच युजर्स रिद्धिमाचे कौतुक करताना दिसत आहेत.

एका टास्क दरम्यान रिद्धिमाने दिव्याच्या डोक्यावर डेटॉलची बाटली ओतली होती. ते डेटॉल तिच्या डोळ्यात गेले होते. यामुळे दिव्या स्तब्ध झाली होती आणि सर्व स्पर्धकांना वाईट बोलू लागली. त्यामुळेच बदला घेण्यासाठी रागाच्या भरात ती रिद्धिमा आणि अक्षरावर बादलीत पाणी घेऊन ओतताना दिसली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Shershaah: ‘आम्हाला माधुरी दीक्षित द्या आम्ही निघून जातो’; पाकिस्तानींच्या या मागणीवर विक्रम बत्रा यांनी दिले होते भन्नाट उत्तर

-भुज: द प्राईड ऑफ इंडिया: अजय देवगणला मोठा झटका, चित्रपट झाला ऑनलाईन लीक

-कोण आहेत शहिद कॅप्टन विक्रम बात्रांच्या प्रेयसी डिंपल, का आहेत आजही अविवाहीत?

हे देखील वाचा