Saturday, July 6, 2024

Bigg Boss OTT: ‘अस्सा’ जोडीदार हवाय म्हणत, शमिताने व्यक्त केल्या राकेशसाठी तिच्या भावना

‘बिग बॉस’ हा छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त शो म्हणून ओळखला जातो. या शोमध्ये प्रेम आणि वाद दोन्ही दाखवले जातात. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा प्रेक्षकांना ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये भरपूर मसालेदार गोष्टी पाहायला मिळत आहे. काही स्पर्धक सतत एकमेकांशी लढत असताना, शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्यातील जवळीकता वाढत असल्याचे दिसत आहे. शमिता शेट्टी आणि राकेश बापट हे ‘बिग बॉस ओटीटी’चे सर्वात सुंदर कनेक्शन आहे. शमिता आणि राकेशची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते.

आता नुकत्याच झालेल्या भागात शमितानेही राकेशबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. शमिता नेहा भसीनला म्हणाली की, “मला राकेश खूप आवडतो आणि राकेशच्या मनातही माझ्या विषयी अशाच काही भावना आहेत.” दरम्यान, नेहा आणि शमिता राकेशसोबत असलेल्या बाकी अभिनेत्रीच्या संबंधांविषयी एकमेकांशी बोलतात. तेव्हा नेहा शमिताला विचारते की, ते दोघे एकमेकांना पसंत करतात का? नेहाला प्रतिउत्तर देताना शमिता म्हणाली की, हो ती आणि राकेश एकमेकांना पसंत करतात. शमिता पुढे म्हणाली की, “राकेश एक चांगला व्यक्ती आहे आणि तो तिला खूप आवडतो.”

शमिताला हवाय असा जोडीदार
शमिता म्हणाली की, राकेश पूर्वी तिचा हात धरत असायचा. ती सकाळी उठली कि तिला मिठीत घ्यायचा. परंतु इतर स्पर्धकांमुळे त्याने आता हे सर्व करणे राकेशने बंद केले आहे. या वयात तिला फ्लर्ट करायचे नाही, असेही शमिता म्हणाली. जर कोणी तिच्या आयुष्यात येत असेल, तर तो कायमचा यायला हवा.

शमिताने सांगितले की, तिला एक असा साथीदार हवा आहे ज्याला तिच्याबद्दल अभिमान वाटेल. तिला एक स्ट्राॅन्ग व्यक्तिमत्त्व असलेल्या जोडीदाराची गरज आहे. पण राकेश तिला गोंधळात टाकतो. आता राकेश आणि शमिताची गोंडस प्रेमकथा शोमध्ये किती पुढे जाते हे पाहणे रंजक ठरणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यनंतर एजाज खानने मागितली माफी; म्हणाला, ‘जर मी तुझ्याशी…’

-सिद्धार्थ शुक्ला मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांनी नोंदवला एडीआर, डॉक्टरांनी ‘या’ मृत्यूची वर्तवली शक्यता

-कधी ओपन शर्ट, तर कधी जंगलात बिकीनी घालून पोझ देतेय अदाकारा; वेड लावतोय मौनीचा हा कातीलाना अंदाज

हे देखील वाचा