Sunday, August 3, 2025
Home व्हिडीओ उर्फी जावेदने घातला जागोजागी फाटलेला ड्रेस, युजर्सने उडवली अभिनेत्रीची खिल्ली, व्हिडिओ व्हायरल

उर्फी जावेदने घातला जागोजागी फाटलेला ड्रेस, युजर्सने उडवली अभिनेत्रीची खिल्ली, व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्ससाठी नेहमीच चर्चेत असते. ती अनेकदा अशा गोष्टींपासून कपडे बनवते, ज्यामुळे लोक आश्चर्यचकित होतात. तिचे नाव डोळ्यासमोर येताच ती यावेळी काय नवीन करणार असा विचार नेटकऱ्यांना पडताे. अशातच उर्फी पुन्हा एकदा तिच्या अतरंगी फॅशनसह पुन्हा चर्चेत आली आहे. खरे तर, उर्फीचा एक नवीन व्हिडिओ समाेर आला आहे, ज्यामध्ये तिचा नवा लूक पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

अलीकडेच उर्फी (urfi javed) एका कार्यक्रमात पोहोचली होती, जिथे ती ब्लॅक लूकमध्ये दिसली. यावेळी उर्फीने पूर्ण कटआउट ड्रेस परिधान केला होता. या काळ्या ड्रेससोबत अभिनेत्रीने तिच्या केसांचा बन बनवला आणि गाेल्डन ईयररिंग्स घातले हाेते. उर्फी जावेदचा हा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. तिची ही अतरंगी स्टाईल पाहून चाहते थक्क झाले आहेत आणि तिच्या व्हिडिओवर भन्नाट कमेंट करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

पॅपराझींने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘तुम्हाला उर्फीचा आउटफिट कसा वाटला?’ अशात यावर कमेंट करत एका युजरने लिहिले की, ‘उर्फीजवळ बॉम्बस्फोट झाल्यासारखे वाटते.’, तर एक युजर म्हणाला, ‘ उर्फीचा ड्रेस कुत्र्याने फाडला.’ उर्फीच्या या व्हिडिओवर अशा अनेक कमेंट येत आहेत.

उर्फी जावेदने आपल्या करिअरची सुरुवात लोकप्रिय टीव्ही शो ‘टेढ़ी मेढ़ी फॅमिली’मधून केली होती. यानंतर ती ‘चंद्र नंदिनी’, ‘मेरी दुर्गा’ आणि इतर अनेक शोमध्ये दिसली. तिला सर्वाधिक लोकप्रियता करण जोहरच्या बिग बॉस ओटीटी या रिअॅलिटी शोमधून मिळाली. (bigg boss ott contestants urfi javed brutally trolled for wear full cut out dress video goes viral on social media)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मागील पानावरून पुढे! मराठीमधील ‘या’ लोकप्रिय कलाकारांच्या त्रिकुटाची तब्बल ४ दशकांनी एकत्र भेट, व्हिडिओ झाला व्हायरल

दुःखद! ‘या’ प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्याचे निधन वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हे देखील वाचा