Saturday, July 6, 2024

Bigg Boss OTT: ‘मनी हाइस्ट’च्या गाण्यावर दिव्या, मिलिंद अन् अक्षराने लावला देसी तडका; भन्नाट डान्स झाला व्हायरल

लाखो प्रेक्षकांची मने जिंकणारा ‘बिग बॉस ओटीटी’ या शोमध्ये रोज नवनवीन गोष्टी घडत असतात. सर्व स्पर्धक मेहनतीने आणि एन्जॉय करत आपले टास्क पूर्ण करतात. या स्पर्धकांना हे टास्क पूर्ण करताना कधी गाणी गावी लागतात, तर कधी वेगवेगळ्या गाण्यांवर ताल धरावा लागतो. असे मजेशीर टास्क पूर्ण करताना स्पर्धक खूप आनंदी असतात. अशात या शोमध्ये काही स्पर्धकांनी ‘मनी हाइस्ट’च्या शीर्षक गीतावर भन्नाट डान्स केला आहे.

दिव्या अग्रवाल, मिलिंद गाबा आणि अक्षरा सिंग यांनी शुक्रवारी (२७ ऑगस्ट) ‘मनी हाइस्ट’ च्या शीर्षक गीतावर मजेशीर डान्स केला. वूटच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यांचा हा डान्स पाहून चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सर्वत्र त्यांच्या या डान्सची चर्चा सुरु आहे. त्यांनी या गाण्यावर आपल्या वेगळ्या अंदाजात डान्स केला आहे. कधी भांगडा, तर कधी भरतनाट्यम करत त्यांनी आपल्या या डान्सला चारचाँद लावलेले पाहायला मिळाले. त्यावेळी बिग बॉसच्या घरात एक वेगळीच रंगत भरली होती. (bigg boss ott divya agarwal milind gaba and akshara singh dance on money heist anthem watch video)

बिग बॉसच्या घरात नेहमीच काही ना काही विचित्र घडत असतं. अशात काही दिवसांपूर्वी दिव्या, मिलिंद आणि अक्षरा उपोषणावर बसले होते. नेहा आणि प्रतीकला बॉस बनवल्यानंतर त्यांना राग आला होता. त्यांनी या निर्णयावर निषेध व्यक्त करत उपोषण केले होते. मिलिंदने, तर त्याचे सामान घराबाहेर काढले आणि लॉन परिसरात मांडले. त्यानंतर त्याचे समर्थन करत दिव्या आणि अक्षरा देखील उपोषणावर बसले.

दिव्या आणि अक्षरा बरोबर जीशानचे भांडण झाले होते. या भांडणांमध्ये जीशानचे रौद्र रूप पाहायला मिळाले. त्यामुळे बिग बॉसने त्याला घराबाहेर काढले. त्यानंतर त्याने सोशल मीडियावर त्याचे काही फोटो पोस्ट केले. त्यामध्ये त्याच्या शरीरावर झालेल्या जखमा दिसत होत्या. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी बिग बॉसने त्याला घराबाहेर काढण्याच्या निर्णयावर असहमती दर्शवली. गेले काही दिवस बिग बॉसच्या घरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. परंतु आता दिव्या, मिलिंद आणि अक्षराच्या भन्नाट डान्सने पुन्हा एकदा खेळीमेळीचे वातवरण तयार झाले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मुघलांना ‘डाकू’ म्हटल्यामुळे ‘या’ कलाकारांच्या निशाण्यावर आले मनोज मुंतशीर; ऋचा म्हणतेय, ‘खूपच बकवास…’

-तरुणींनाही लाजवेल असं आहे तिचं सौंदर्य! पाहा सिल्व्हर आऊटफिटमध्ये श्वेता तिवारीचा ग्लॅमरस अंदाज

-‘बिग बीं’च्या घरात निर्माण झालीय पाण्याची समस्या? ब्लॉगमध्ये कामाबद्दल व्यक्त केली चिंता

हे देखील वाचा