Saturday, June 29, 2024

दिव्या अग्रवालची करण जोहरवर आगपाखड; म्हणाली, ‘तू बॉलिवूडचा राजा आहेस म्हणून काय…’

‘बिग बॉस ओटीटी’मधील शेवटच्या ‘वीकेंड का वार’ मध्ये शोचा होस्ट करण जोहरने दिव्या अग्रवालची शाळा घेतली होती. करणने दिव्याला त्याचे नाव आदराने घ्यायला सांगितले होते. जर तसे तिला जमत नसेल, तर नाव न घेण्यास सांगितले होते. करणने फटकारल्यानंतर दिव्याचाही पारा चढला आहे.

दिव्याच्या एका वक्तव्याचा संदर्भ देत करण जोहर म्हणाला की, तिला एलिमिनेशनसाठी तिला नॉमिनेट करायचे आहे. पण, ती हे विसरली की, करण जोहर या शोचा होस्ट आहे. यावर दिव्या म्हणाली होती की, ही फक्त एक मस्करी होती, पण करणने प्रतिसादात दिव्याला त्याच्यासोबत बिग बॉस न खेळण्यास सांगितले.

याच्या व्यतिरिक्त, करण जोहर मागील ‘वीकेंड का वार’मध्ये दिव्या अग्रवालवर खूप भडकला होता. त्याचबरोबर असेही म्हटले होते की, ती इंडस्ट्रीतील लोकप्रिय शमिता शेट्टी, नेहा भसीन आणि राकेश बापट यांच्याशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करत आहे आणि अक्षरा सिंग भोजपुरी अभिनेत्री असल्याने ती तिच्या सोबत बोलतही नाही. करण जोहरने सर्वांसमोर घेतलेल्या शाळेनंतर आता दिव्या अग्रवालचा रागही उफाळून आला आहे.

त्यानंतर ‘संडे का वार’बद्दल दिव्या अग्रवाल अक्षरा सिंगसोबत बोलली होती. या दोघींमध्ये ही चर्चा झीशान खान बिग बॉसच्या घरातून गेल्यानंतर झाली होती. दिव्या आणि झीशान हे एकमेकांचे कनेक्शन होते. याच दरम्यान करण जोहरबद्दल बोलताना दिव्या म्हणाली की, “करण जोहरने माझ्याबद्दल अशा गोष्टी बोलल्या आहेत, त्यामुळेच मला इथे त्रास सहन करावा लागत आहे.”

त्याचबरोबर दिव्या पुढे म्हणाली की, “तुला वाटतं ना की, तू बॉलिवूडचा आहे आहेस. तुझ्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द लोक ऐकतात आणि समजून घेतात. हे पण खरं आहे की, तू जे काय बोलतोस लोक त्यावर विश्वास ठेवतात. मग तो माझ्याबद्दल असा कसा काय बोलू शकतो?”

आता या ‘वीकेंड का वार’ मध्ये करण जोहर यावर आपली काय प्रतिक्रिया देतो हे पाहण्यासारखे आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘या’ क्लोथिंग ब्रँडचा मालक आहे करणवीर बोहरा; वडील अन् आजोबांचेही होते चित्रपटांशी नाते

-‘इथे सूर्यप्रकाश येतोय…’, म्हणत अनन्या पांडेने शेअर केले घायाळ करणारे ‘ब्लॅक ऍंड व्हाईट’ फोटोशूट

-कंगनासोबत ब्रेकअपनंतर तुटून गेला होता अध्ययन; वडील शेखर यांच्या ‘या’ सल्ल्याने दिली त्याला हिंमत

हे देखील वाचा