Tuesday, July 9, 2024

बाप रे! अक्षरा सिंगवर होणार होता ऍसिड हल्ला; खुलासा करत म्हणाली…

भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंग ‘बिग बॉस ओटीटी’ची स्पर्धक होती. जोपर्यंत ती बिग बॉसच्या घरात होती तोपर्यंत तिने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. अक्षरा सिंग ही मागच्या आठवड्यात मिलिंद गाबा या तिच्या कनेक्शनमुळे या घरातून बेघर झाली. घरातून बाहेर पडल्यानंतर अक्षरा सिंगने शोबद्दल स्पर्धक आणि शोचे होस्ट करण जोहर यांच्यासह अनेक खुलासे केले. तिने शो हा फिक्स आहे आणि करण जोहरवर भेदभावाचा आरोप केला. आता अक्षराने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

अक्षराने सांगितल्या धक्कादायक गोष्टी
एका माध्यमांतील वाहिनीशी केलेल्या खास मुलाखतीत अक्षरा सिंगने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. तिने सांगितले की, “एका क्षणी माझे आयुष्य असे बनले होते, जेथे मनोरंजन विश्वाशी संबंधित लोक मला सोडून गेले होते. माझ्या एक्स बॉयफ्रेंडने मला धमकी दिली की ,तो माझे करियर नष्ट करेल.” अक्षराने पुढे सांगितले की, तिला आयुष्यात खूप वेदना सहन कराव्या लागल्या, पण तिने कधीही हार मानली नाही आणि सिंहासारखा प्रत्येक परिस्थितीचा सामना केला.

एक्स बॉयफ्रेंडवर केले गंभीर आरोप
माध्यमांशी खास संभाषणादरम्यान, अभिनेत्री अक्षरा सिंग, जिला भोजपुरी सिनेमाची सिंहीण म्हटले जाते. तिने तिच्या माजी प्रियकराबद्दल अनेक खुलासे केले. अक्षराने तिच्या एक्स बॉयफ्रेंडवर गंभीर आरोप केले. तिने सांगितले की, ती अशा नात्यात होती ज्यामध्ये तिचा गुदमरत होते. अक्षराने सांगितले की, एक वेळ होती जेव्हा परिस्थिती पूर्णपणे तिच्या हाताबाहेर गेली होती आणि ती डिप्रेशनमध्ये गेली होती. पण त्या काळात तिच्या वडिलांनी तिला पाठिंबा दिला आणि तिने स्वतःची लढाई लढली.

ऍसिड घेऊन पाठवले होते मागे
अक्षरा सिंगने खुलासा केला की, तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिच्या मागे काही मुलांना ऍसिड देऊन पाठवले होते. अक्षरा म्हणाली, “त्याने माझ्या मागे काही मुलांना ऍसिडच्या बाटल्या घेऊन पाठवले होते. जे लोक दारूच्या नशेत रस्त्यावर पडले असतात, त्यांना माझ्यामागे पाठवण्यात आले. मी फक्त देवाला प्रार्थना करते की, मी ज्या टप्प्यातून गेले आहे त्या टप्प्यातून कोणत्याही स्त्रीने जाऊ नये.”

वडिलांनी दिले प्रोत्साहन
या कठीण टप्प्याबद्दल बोलताना अक्षरा सिंग म्हणाली की, तिने तिच्या एक्स बॉयफ्रेंडमुळे आयुष्यात बरेच काही पाहिले आहे. अक्षरा म्हणाली, “माझ्या बॉयफ्रेंडने मला खूप धमक्या दिल्या. त्यानंतर मी माझ्या वडिलांशी बोलले आणि त्यांनी मला खूप धैर्य दिले. त्यानंतर मी सर्व काही मागे सोडले. माझ्या मनातली भीती पूर्णपणे नाहीशी झाली. मी आयुष्यात इतके पाहिले होते की, मृत्यूची भीतीही संपली होती. मला असे वाटत होते की, तो काय करणार आहे फक्त मारणारच आहे ना, चला मरू. माझ्या एक्स बॉयफ्रेंडने माझ्यामागे काही मुलांना ऍसिड देऊन पाठवले होते. जेणेकरून तो माझी कारकीर्द संपवू शकेल.

इंडस्ट्रीने दिली नाही साथ
अक्षरा सिंगने सांगितले की, त्या काळात इंडस्ट्रीचा कोणताही सदस्य पुढे आला नाही आणि तिला मदत केली. ती म्हणाली की, “असे काही लोक होते ज्यांनी मला प्रोत्साहन दिले. पण त्यापैकी बहुतेकांनी माझ्याशी जे घडले त्यामुळे माझावर अन्याय केला. मला कोणी पाठिंबा दिला नाही. संपूर्ण इंडस्ट्री एकत्र उभी होती आणि मी दुसऱ्या बाजूला एकटी होते. माझ्याकडे कामही नव्हते. मला इंडस्ट्रीतून कसे बाहेर काढायचे याचा प्रत्येकजण प्रयत्न करत होता. त्यावेळी मी मुंबईत स्वतःला कसे सांभाळले हे मी आणि माझ्या कुटुंबियांना माहित आहे आणि समजते.”

अभिनेत्री अक्षरा सिंगने भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये एक स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ती आज एक प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मामा-भाच्याचे नातं इतकं कसं बिघडलं? जाणून घ्या कृष्णा अभिषेक आणि गोविंदामधील वादाच कारण

-पहिलीपासून लपून दुसऱ्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी ‘दबंग खान’ने चक्क बदलले होते स्वतःचे दात; मजेदार आहे तो किस्सा

-काय सांगताय! बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला ‘या’ गोष्टीची वाटतेय भीती, करण जोहरने केला खुलासा

हे देखील वाचा